कणकवली व कुडाळमधील सोनसाखळी चोरीप्रकरणी सराईत आरोपी अमरावतीतून जेरबंद

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 15 May 2026 | 👁 266 Views
कणकवली व कुडाळमधील सोनसाखळी चोरीप्रकरणी सराईत आरोपी अमरावतीतून जेरबंद
सिंधुदुर्ग एलसीबी पथकाची दमदार कारवाई
कणकवली व कुडाळ परिसरात जबरीने गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरी करणाऱ्या टोळीतील एका सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अमरावती जिल्ह्यातून शिताफीने ताब्यात घेतले आहे. रोहन मोहन हुनकर (वय 23, रा. येरला, ता. मोर्शी, जि. अमरावती) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

कणकवली पोलीस ठाणे तसेच कुडाळ पोलीस ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 304(2), 3(5) अन्वये जबरीने गळ्यातील सोनसाखळी चोरी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता.

तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तसेच मानवी कौशल्य व तांत्रिक तपासाच्या आधारे ११ मे २०२६ रोजी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात सापळा रचण्यात आला. यावेळी संशयित रोहन हुनकर यास पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने आपल्या साथीदारासह मोटारसायकलवर येऊन सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

दरम्यान, आरोपी रोहन हुनकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध वर्धा, अकोला आणि अमरावती येथे सोनसाखळी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. तसेच कोल्हापूर, सांगली आणि अमरावती येथेही तो पाहिजे आरोपी असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी त्यास कणकवली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हवालदार जँक्शन घोन्सालवीस तसेच पोलीस अंमलदार अमर कांडर यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद |