एलपीजीचा अवैध साठा, काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

👤 राहुल टिबे सांगली | 📅 14 May 2026 | 👁 190 Views
एलपीजीचा अवैध साठा, काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष
युध्दजन्य परिस्थितीचा परिणाम आपल्या देशावरच नाही तर संपूर्ण जगावर पडला आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी देशहितार्थ सर्वांनी सहकार्य करावे. एलपीजीचा अवैध वापर टाळण्यासाठी व एलपीजी पुरवठा सुरळीत होण्यासाठी संबंधित विभागांनी एलपीजीचा अवैध साठा व काळा बाजार करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या.



एलपीजी वितरण साखळी नियमित ठेवण्यासाठी व प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी आयोजित विशेष समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस पोलीस अधीक्षक तुषार दोशी, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके, समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, पुरवठा निरीक्षक स्वप्नील फडतरे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, गॅस वितरक आदि उपस्थित होते.



जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, गॅसचा अवैध वापर टाळण्यासाठी पथक नेमून नियमित छापे टाकावेत, गॅस ट्रान्सपोर्टची तपासणी करावी, गॅस वितरकांनी व्यावसायिक गॅस वितरण करताना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करत प्राधान्याने रूग्णालये, शासकीय वसतिगृहे, अंगणवाडी, शाळा, शासकीय आश्रमशाळा व महाविद्यालयातील मेस यांना मागणीनुसार अत्यावश्यक सेवा म्हणून गॅस पुरवठा करावा. दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार गॅस वितरण होते का याची तपासणी केली जावी. गॅस वितरकांनी त्यांना दिलेल्या गुगल शिटवर दैनंदिन गॅस वितरणाची माहिती भरून अद्ययावत करावी. घरगुती गॅसचा अवैध वापर होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.



यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनीही एलपीजी पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी विविध सूचना केल्या. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांबाबत माहिती दिली. गॅस वितरकांनीही त्यांच्या विविध समस्या मांडल्या.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |