पंतप्रधानांच्या आवाहनाला शासनाकडूनच हरताळ! वैभव नाईक यांची टीका

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 13 May 2026 | 👁 219 Views
पंतप्रधानांच्या आवाहनाला शासनाकडूनच हरताळ! वैभव नाईक यांची टीका
डिझेल वापर कमी करा, सोन्यावरील वाढती गुंतवणूक थांबवा. परदेश दौरा करु नका, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेला आवाहन करत आहेत. मात्र, मंत्र्यांच्या ताफ्यात पुढे आणि मागे चार-चार गाड्या असतात, अधिकारी विविध ठिकाणी वाहने फिरवून पेट्रोल, डिझेलचा गैरवापर करतात. मंत्रांनी गर्दी दाखवण्यासाठी ताफा कमी केला तर मोठ्या प्रमाणात पेट्रोल, डिझेलची बचत होऊ शकते. मोदींच्या आवाहनाला शासनाकडूनच हरताळ फासला जात आहे. त्यामुळे निर्बंध लादल्याने केवळ सामान्य जनताच या महागाईत होरपळू नये, असा टोला उद्धवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.

याबाबतच्या प्रसिध्दी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेलचे बचतीचे आवाहन केले आहे. परदेशी दौरे थांबवा, असे आवाहन मोदींनी केले आहे. परंतु १५ मे पासून पंतप्रधान परदेश दौऱ्यावर जात आहेत. दुसरीकडे सामान्य नागरिक पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे हैराण झाले आहेत. गरज असेल तरच लोक घराबाहेर पडत आहेत. नोकरी, व्यवसाय किंवा अन्य कारणांसाठी दुचाकी वापरणाऱ्या सामान्य माणसावर याचा मोठा परिणाम होत आहे. पेट्रोल दरवाढीमुळे आधीच होरपळणाऱ्या जनतेवर नव्या करांचा बोजा पडणार आहे. सामान्य माणूस या आर्थिक संकटातून बाहेर पडू शकणार नाही, अशी सध्या स्थिती आहे.
शासकीय यंत्रणेमधील वाहनांच्या वापराबाबतही शासनाने नियंत्रण आणले पाहिजे. तालुक्याच्या ठिकाणी ग्रामसेवकांपासून शिक्षकांपर्यंत, अधिकारी त्यांच्या नेमलेल्या ठिकाणी राहिले तरी इंधनाची बचत होईल, त्याची अंमलबजावणी करावी. सामान्य लोकांसाठी सोनं ही एक सुरक्षित गुंतवणूक असते. अडचणीच्या काळात उपयोगी पडावे म्हणून लोक थोडं थोडं सोनं खरेदी करतात. देशहितासाठी लोक सोन्याची खरेदी कमी करतील. मात्र, मोठे उद्योगपती, राजकीय नेते आणि गुन्हेगार मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत. त्यांच्यावर शासन कारवाई करणार का? असा खरा प्रश्न आहे.
मोदी शासनाच्या नोटबंदीच्या काळात सामान्य जनता जशी होरपळली, तशीच परिस्थिती पेट्रोल आणि सोन्याच्या मुद्द्यावर होऊ नये, एवढीच आमची अपेक्षा आहे.शासनाने सामान्य जनतेला कोणत्याही मार्गातून वेठीस धरु नये, अन्यथा उद्धवसेना तीव्र आंदोलन करेल,असा इशाराही वैभव नाईक यांनी दिला आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |