तिथवलीत टायर फुटून वीज खांब वाहतूक करणारा टेम्पो पलटी; दोन कामगार जखमी

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 13 May 2026 | 👁 218 Views
तिथवलीत टायर फुटून वीज खांब वाहतूक करणारा टेम्पो पलटी; दोन कामगार जखमी
खारेपाटण -कोल्हापुर मार्गावर तिथवली-नाऊळदेवाडी येथे वीज खांब वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा टायर फुटून अपघात झाला.यात दोन कामगार जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती येथून वीज खांब घेऊन एक टेम्पो खारेपाटणच्या दिशेने निघाला होता. टेम्पोमध्ये वीज खांबांसह तब्बल सात कामगार प्रवास करत होते. तिथवली-नाऊळदेवाडी येथे आल्यानंतर अचानक टेम्पोचा टायर फुटला आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला पलटी झाला.या अपघातात दोन कामगार जखमी झाले . त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
दरम्यान, टेम्पोमधून वीज खांबांसारख्या जड साहित्याची वाहतूक सुरू असताना त्याच वाहनातून कामगारांची वाहतूक केली जात होती. तसेच वाहनाचे टायर वापरण्यास अयोग्य असलेल्या स्थितीचे होते.त्यामुळेच हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीच म्हणणे आहे.टेम्पो चालकाचा बेफिकीरपणा कामगारांच्या जीवावर बेतला असता.मात्र सुदैवाने मोठी हानी टळली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद |