तासगावात 9ऑगस्ट क्रांतीदिन उत्साहात साजरा

👤 संतोष एडके तासगाव | 📅 09 August 2026 | 👁 60 Views
तासगावात 9ऑगस्ट क्रांतीदिन उत्साहात साजरा


महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती,राष्ट्रसेवा दल,विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर विचारमंच,मेढपाळ आर्मी,समविचारी पक्ष‌,संघटना व स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव मध्ये 9ऑगस्ट क्रांतीदीन उत्साहात साजरा करण्यात आला.तासगाव मंडल कृषी अधिकारी सौ जाधव मॅडम आणि सौ तावरे मॅडम यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिक स्तंभाला हार घालण्यात आला .
तासगाव मधील जुन्या तहसील कार्यालया जवळ स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाची दखल घेऊन एक स्तंभ निर्माण केलेला आहे.या स्तंभावर स्वातंत्र्य सैनिकांची नांवे नोद केलेली आहेत.हा नावाचा स्तंभ आत्ता नवीन डागडुजीच्या प्रतिक्षेत आहे.तासगाव ची ही जुनी तहसील कार्यालयाची ईमारत एका मोठ्या ऐतिहासीक प्रंसगाची साक्षीदार आहे.ही ईमारत आणि या ईमारती पुढील स्वातंत्र्य सैनिक स्तंभ यांची अवस्था नक्कीच समाधान कारक नाही.या ईमारती बरोबर तासगावचा क्रांतीकारक ईतिहास आणि त्यांच्या स्मृती जागवणार्या गोष्टी जतन होणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे , 9 ऑगस्ट 1989रोजी डाॅ नरेद्र दाभोळकरांनी अंधश्रध्दा निर्मुलन समितीची स्थापना केली या दिवसांचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अंनिसच्या वार्तापत्राचा ऑगस्ट महीन्याच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी डाॅ बाबुराव गुरव, सुधाकर कोळी,प्रा राजेश रोमन,प्रा संजय वावरे,प्रा वासुदेव गुरव,भिमराव भंडारे,भरत थोरात,बाबुराव थोरात,दत्तात्रेय बामणे,आर एन माळी,ऋतुजा खोत,अमर खोत व कार्यकर्त उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
तासगावात 9ऑगस्ट क्रांतीदिन उत्साहात साजरा | हक्कांच्या संघर्षासोबत समाजविकासाची नवी वाट; ‘मेंढपाळ आर्मी’ची उल्लेखनीय वाटचाल | महेश नार्वेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त कणकवलीत सफाई कामगारांना धान्य वाटप | कणकवलीत १६ ऑगस्टला सम्यक साहित्य संसदेच्या पुरस्कारांचे वितरण | 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी हीच अण्णासाहेबांसाठी लाख मोलाची शुभेच्छा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | " दहीहंडी पथकातील गोविंदांसाठी 10 लाखांचे विमाकवच!" | महाराष्ट्राच्या शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनात डॉ. बापूजी साळुंखे यांचे योगदान महत्त्वाचे : प्रा. सी. वाय. मानेपाटील | सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांची मुळदे येथील मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्पास भेट* | ज्येष्ठ शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने मोठी पोकळी; वैभव नाईक यांच्याकडून श्रद्धांजली | महिला नेत्यांचा अवमान महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारा नाही; हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी – निशिकांत कडुलकर |