9 ऑगस्ट ला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आष्टा नगरीत

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 02 August 2026 | 👁 97 Views
9 ऑगस्ट ला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आष्टा नगरीत
सांगली जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक मोठे नाव म्हणजे मूळ भाजपाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी ग्रामीण विकास मंत्री डॉ. श्री अण्णासाहेब डांगे आप्पा.भाजपाच्या उभारणीत आणि वाढीत आप्पांचे योगदान अतिशय मोठे आहे.त्यांच्या जीवनकार्याचा गौरव करणारा आणि त्यांच्या 91 व्या वर्षात पदार्पणानिमित्तचा 'अमृतवृक्ष' या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा येत्या 9 ऑगस्ट 2026 रोजी आष्टा येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते प्रकाशन होणार आहे.
या आत्मचरित्रातून आप्पांच्या जीवनातील अनेक अविस्मरणीय प्रसंग वाचकांना त्यांच्याच खास शैलीत अनुभवायला मिळणार आहेत.
एका सर्वसामान्य धनगर शेतकरी कुटुंबातून आलेली ही व्यक्ती एक कार्यकर्ता ते महाराष्ट्र राज्याचे मंत्रीपद पर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर होता. अनेक राजकीय वादळे झेलत त्यांनी स्वतःसोबतच आपल्या कुटुंबालाही समर्थपणे सांभाळले.
आप्पांच्या संकल्पनेतून उभारलेले संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल आज राज्यात नावलौकिक मिळवत आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग सोबतच सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी येथे आश्रम शाळा देखील चालवल्या जातात. जिथे शिक्षण, भोजन आणि राहण्याची व्यवस्था अतिशय उत्तम दर्जाची आहे
वयाच्या 90 पर्यंतही निरोगी आणि शिस्तबद्ध जीवन जगणारे आप्पा योग्य आहार आणि व्यायामामुळे आजही तितकेच कार्यरत आहेत. नुकतेच त्यांनी 91 व्या वर्षात पदार्पण केले आहे.
या अभूतपूर्व सोहळ्याला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा सभापती राहुल नार्वेकर, मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह महायुतीचे सर्वच ज्येष्ठ मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आप्पांच्या जीवनप्रवासाचा आणि कार्याचा गौरव करणाऱ्या या सोहळ्याला सांगलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
9 ऑगस्ट ला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आष्टा नगरीत | ऊसतोड कामगाराचा मुलगा ते शिवछत्रपती पुरस्कार विजेता; शंकर गदईंचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर | आचरा गावातील बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करा; अन्यथा १५ ऑगस्टला तीव्र आंदोलनाचा इशारा | मालवण बंदरा येथील पोर्टा केबिनचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन | प्रशासनाने अधिक गतीने काम करत शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात पालकमंत्री नितेश राणे | भगवान गौतम बुद्ध हेच खरे विश्वगुरू जानवलीच्या बुद्ध विहारात आषाढी पौर्णिमेचा प्रारंभ दिन कार्यक्रम | प्रवासी हेच आपले दैवत"हे ब्रीद अंगिकारुन संतोष भाट यांनी एसटी गाड्यांच्या दुरुस्तीचे काम अत्यंत चोख आणि जबाबदारीने पार पाडले - श्रीनिवास कदम | महसूल विभाग हा शासन आणि जनतेमधील विश्वासाचा मजबूत दुवा पालकमंत्री नितेश राणे | आगाऊ धान्य वितरणाच्या निर्णयाचा पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला सखोल आढावा | पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक .. |