सांगलीत 500+ पदांसाठी भव्य रोजगार मेळावा! 30 जुलैला 19 कंपन्यांची भरती

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 28 July 2026 | 👁 184 Views
सांगलीत 500+ पदांसाठी भव्य रोजगार मेळावा! 30 जुलैला 19 कंपन्यांची भरती
सांगली | जिल्हा प्रतिनिधी
बेरोजगार युवक-युवतींसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने गुरूवार, दिनांक 30 जुलै 2026 रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ठिकाण:-श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली- वेळ :-सकाळी 10:00 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत.या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील 19 नामांकित खाजगी आस्थापनां कडून 500 पेक्षा जास्त रिक्त पदांसाठी थेट भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील नोकऱ्यांच्या संधी येथे उपलब्ध असतील.
या मेळाव्याचा जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.
अर्जदारांनी सोबत आणावेत:
1. बायोडेटा - 2 प्रती
2. शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स
3. पासपोर्ट साईझ फोटो
4. आधार कार्ड

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
पंढरीच्या वारीत 'मुक्या' जीवांची अनोखी विठ्ठल सेवा | सोलापूर विद्यापीठात १५० कंत्राटी पदांची भरती; नव्या निविदेची प्रक्रिया सुरू | सोलापूरच्या शासकीय हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; १२ वी नंतर उज्ज्वल करिअरची सुवर्णसंधी | कारगिल विजय दिवसाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापुरात कारगिल शहीदांना सैनिकांच्या शिस्तबद्ध शैलीत मानवंदना | ठेकेदारांना अभय, नागरिकांना त्रास' | पीक विम्यात देवगडच्या शेतकऱ्यांवर अन्याय; कृषी अधिकाऱ्यांना सभागृहात धारेवर | वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तब्बल आठ तासाने मिळाला मृतदेह..... | पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने करुळ येथील शेतकरी बेपत्ता | ओटभरणी समारंभात रुजवले संस्कारांचे बीज! | अनुसयामाता विश्रांतीधाम आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सव |