ईश्वरपूरमध्ये पाण्याच्या मीटरची धडाधड चोरी! 4-5 दिवसात मोठा प्रकार, नागरिक त्रस्त

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 06 August 2026 | 👁 82 Views
ईश्वरपूरमध्ये पाण्याच्या मीटरची धडाधड चोरी! 4-5 दिवसात मोठा प्रकार, नागरिक त्रस्त
ईश्वरपूर शहरात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या मीटर चोरीचा भलताच प्रकार सुरू झाला आहे. यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत.शहरातील विविध भागांमधून घराबाहेर आणि नळ कनेक्शन जवळ लावलेले पाण्याचे मीटर अचानक गायब होत आहेत. नागरिकांनी वारंवार ईश्वरपूर नगर परिषदेत जाऊन अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. एका वेळी अनेक ठिकाणी अशा प्रमाणात मीटर चोरी झाल्याने नगर परिषदेचे अधिकारी देखील अचंबित झाले आहेत.यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, चोर हे मीटर पितळ धातूचे आहेत असे समजून चोरी करत आहेत. परंतु प्रत्यक्षात ही मीटर बीड धातूची असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे चोरांना यातून आर्थिक फायदा होण्याची शक्यता फारच कमी आहे.नागरिक तसेच नगर परिषद प्रशासनाने याबत तातडीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. जर चोर सापडले तर त्यांच्यावर पोलीस कारवाई निश्चित होणार आहे.नागरिकांनी रात्री गस्त वाढवणे आणि दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. मीटर नसल्याने अनेक घरांची पाणी बिले आणि पाणी पुरवठा देखील विस्कळीत होण्याची भीती आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ईश्वरपूरमध्ये पाण्याच्या मीटरची धडाधड चोरी! 4-5 दिवसात मोठा प्रकार, नागरिक त्रस्त | महात्मा फुले योजनेतील 15,407 संशयास्पद दाव्यांची SIT चौकशी होणार ! | पर्ल्स (PACL) गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे अपडेट | कागदी रेशनकार्ड 15 ऑगस्टपासून बंद! | नागरिकांना दिलासा! आधार कार्डसाठी असे जन्म दाखले ग्राह्य धरणार | सामाईक विहिरीवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू | सावळजमध्ये साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप | ग्रामीण मातीतला ओम आज ‘टीम इंडिया’चा स्टार; व्हॉलीबॉलच्या स्वप्नाला मिळाली आंतरराष्ट्रीय भरारी | झरे येथे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न | तासगाव तालुक्यात समन्यायी पाणी वाटपाची गरज; "शेतकऱ्यांना न्याय्य पाणी कधी मिळणार?" – डॉ. भारत पाटणकर |