4 जूनला ट्री आर्मीच्या उपक्रमाचा शुभारंभ

👤 विटा प्रतिनिधी | 📅 02 June 2026 | 👁 251 Views
4 जूनला ट्री आर्मीच्या उपक्रमाचा शुभारंभ
पर्यावरणप्रेमींशी जॅकी श्रॉफ साधणार संवाद
आमदार सुहास बाबर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या 'ट्री आर्मी' या चळवळीने आता गती घेतली आहे. ट्री आर्मीच्या माध्यमातून वृक्षारोपन ही आता चळवळ बनत आहे. या उपक्रमाच्या शुभारंभासाठी आता बॉलीवूड स्टार जॅकी श्रॉफ येणार आहे. दि. 4 रोजी सकाळी जॅकी दादांच्या उपस्थितीत गार्डी घानवड सूतगिरणीच्या पाठीमागील जागेत तब्बल साडेचार हजार झाडे लावण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार सुहास बाबर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
या उपक्रमाबाबत माहिती देताना आमदार सुहास बाबर म्हणाले, जॅकीचे पर्यावरण क्षेत्रात चांगले काम आहे. मात्र ते कधीच समाजापुढे आले नाही. यामुळे रूपेरी पडद्यावरील जॅकी अर्थात जग्गूदादाची ही सामाजिक बाजू लोकांना पहायला, ऐकायला आणि अनुभवायला मिळणार आहे. 'ट्री आर्मी' या चळवळीने आता गती घेतली आहे. ट्री आर्मीच्या माध्यमातून वृक्षारोपन ही आता चळवळ बनत आहे. जॅकी श्रॉफ यांच्याशी संवाद साधण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने आपले योगदान देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी ट्री आर्मीच्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार बाबर यांनी केले आहे.
पुढे बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले, विधानसभा निवडणूकीनंतर आपण जेवढे मताधिक्य जनतेने आपल्याला दिले आहे, तेवढी झाडे लावण्याचा संकल्प केला होता. ट्री आर्मीच्या माध्यमातून हा संकल्प पूर्ण करण्याचा आपला मानस आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतीच रणजित पाटील यांच्या पुढाकारातून साळशिंगे रस्त्याला झाडे लावली आहेत. त्याची जोपासणा चांगली होत आहे.
या निमीत्ताने जॅकी श्रॉफ अर्थात जग्गू दादा यांच्याशी संवाद साधता येणार आहे. जग्गू दादाची सामाजिक बाजू लोकांना पहायला, ऐकायला आणि अनुभवायला मिळणार आहे. शिवाय या ठिकाणीही मियावाकी पद्धतीचे जंगल उभारण्यात येणार आहे, पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने आपले योगदान देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी ट्री आर्मीच्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार बाबर यांनी केले आहे. यावेळी माजी नगरसेवक अमर शितोळे, नविन यात्रा कमीटीचे अध्यक्ष रणजित पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर, नगरसेवक भालचंद्र कांबळे, अॅड. रोहित पवार, श्रीधर जाधव, सरपंच संग्राम नलवडे, सौरभ रोकडे, दिलिप किर्दत, सुजय गोसावी, कर्तव्य फौंडेशन आणि ट्री आर्मीचे सैनिक उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मणेराजुरी येथे तलावात बुडून माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू; चिमुरडीला वाचवताना आईनेही गमावला जीव | लातूरमध्ये 'ती' बैलाच्या जागी स्वतः जुंपली नांगराला! काळजाचा थरकाप उडवणारी विदारक वास्तवता | संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! |