अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या ₹300 कोटी निधीचे वितरण सुरू

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 12 August 2026 | 👁 100 Views
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या ₹300 कोटी निधीचे वितरण सुरू
सांगली, दि. 11 : -अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास महाराष्ट्र शासनाकडून मंजूर झालेला ₹300 कोटींचा निधी प्राप्त झाला असून, 10 ऑगस्ट 2026 पासून या निधीच्या वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती महामंडळाच्या जिल्हा समन्वयक निशा पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. महामंडळाच्या विविध योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार हा निधी वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वयंरोजगार, व्यवसायवृद्धी आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासोबतच आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील पात्र लाभार्थ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
सांगली जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी आपल्या अर्जाची सद्यस्थिती, आवश्यक कागदपत्रे तसेच निधी वितरणाबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.महामंडळाच्या अधिकृत माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनांनुसार पात्र लाभार्थ्यांनी पुढील कार्यवाही करावी, असे आवाहनही प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
राजारामबापू साखर कारखाना विस्तारीकरण प्रस्तावावर ग्रामस्थांच्या हरकती | राजारामबापू साखर कारखाना विस्तारीकरण प्रस्तावावर ग्रामस्थांच्या हरकती | चिंचणी-वांगी बलात्कार प्रकरणातील आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी | द्वेषाची फवारणी! दिघंचीत युवा शेतकऱ्याच्या उभ्या ढब्बू मिरचीवर तणनाशक मारले; १० लाखांचे पीक उद्ध्वस्त | सागरी कासव संरक्षणासह कोळंबी निर्यातीला चालना; ट्रॉलरवर TED बसविणे बंधनकारक | २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतरचा रस्ता पहिल्याच पावसात उखडला! | रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मुंबईत ‘आरोग्य कॉरिडॉर’ उभारण्याची -आमदार प्रमोद जठार यांची मागणी | कणकवली बाजारपेठेत जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा -पाच जणांवर गुन्हा दाखल | श्री संत दामाजी महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती उत्साहात साजरी | अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या ₹300 कोटी निधीचे वितरण सुरू |