महाडीबीटीवरील अनुसूचित जाती विद्यार्थ्यांच्या प्रलंबित अर्जांसाठी 26 मे रोजी विशेष कार्यशाळा

👤 अतुल फसाले | 📅 24 May 2026 | 👁 257 Views
महाडीबीटीवरील अनुसूचित जाती विद्यार्थ्यांच्या प्रलंबित अर्जांसाठी 26 मे रोजी विशेष कार्यशाळा

सोलापूर, दि. २२ : महाडीबीटी पोर्टलवर सन २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीतील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यासाठी सोमवार, दि. २६ मे २०२६ रोजी एक दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सोलापूर येथे होणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

सहाय्यक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जांतील प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच शिष्यवृत्ती कामकाज पाहणारे कर्मचारी यांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाडीबीटी पोर्टलवरील रखडलेले अर्ज निकाली निघाल्यास अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे संबंधित संस्थांनी वेळेत उपस्थित राहून प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |