जिल्हा परिषद शाळा हळवल नंबर 2 च्या वतीने बांधावरची शाळा उपक्रम संपन्न

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 July 2026 | 👁 164 Views
जिल्हा परिषद शाळा हळवल नंबर 2 च्या वतीने बांधावरची शाळा उपक्रम संपन्न
मुलांना तरवा काढणे व लावणी करणे याची प्रात्यक्षिक दाखवून माहिती देण्यात आली
राज्य शासनाच्या वतीने एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम सर्वच शाळांमध्ये राबविला जातोय. त्याचं अनुषंगाने शाळेतील मुलांना शेतात नेऊन त्याची माहिती शालेय मुलांना व्हावी या हेतूने बांधावरची शाळा हा उपक्रम राबविला जात आहे. तळकोकणात देखील जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जातं आहे. कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा हळवल नंबर 2 या प्रशालेच्या वतीने बांधावरची शाळा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मुलांना बळीराजाच्या शेतात नेऊन तरवा काढणे व लावणी करणे याची प्रात्यक्षिक दाखवून माहिती देण्यात आली. चिमुकल्यांनी तर धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान हे गीत गात तरवा काढला लावणी केली व बळीराजा प्रमाणेच शेताच्या बांधावर बसून न्याहरी केली. या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुविधा वालावलकर, शिक्षिका वेदा गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले या उपक्रमाच्या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश परब, दिपक राऊळ, तुषार ठाकूर, वामन परब, मधुकर परब, अनिकेत परब, मनीष परब, यश परब, विकास गावडे, दिव्या परब, रेश्मा चव्हाण, रुपाली राणे, सुनीता राऊळ, सुवर्णा परब, वेदा राऊळ, राजश्री रामचंद्र परब, राखी परब, राजश्री परब, ममता परब, कीर्ती परब, आदी ग्रामस्थांचे सहकार्य लाभले
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |