मुंबई | महाराष्ट्र शासन :-
ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे ग्रामपंचायतींना जन सुविधांसाठी विशेष अनुदानातून 5 नवीन प्रकारची कामे करता येणार आहेत.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना खालील कामांसाठी थेट निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे:
1.गावांमध्ये दिवाबत्तीची सोय करणेसाठी - कमाल मर्यादा 15 लाख रुपये
2.शासकीय कार्यालयावर सोलर बसविणेसाठी कमाल मर्यादा 20 लाख रुपये
3 वाचनालय इमारत बांधकाम करणेसाठी कमाल मर्यादा 20 लाख रुपये
4.क्रीडांगण विकास करणेसाठी कमाल मर्यादा 20 लाख रुपये
5.गावांच्या हद्दीत असलेल्या शासकीय जागांचे सौंदर्यीकरण करणेसाठी कमाल मर्यादा 15 लाख रुपये
महत्वाचे म्हणजे शासनाने स्पष्ट केले आहे की, या योजनेंतर्गत मंजूर करण्यात येणारी कामे अन्य कोणत्याही योजनेमधून प्रस्तावित करण्यात किंवा घेण्यात येऊ नयेत. म्हणजेच दुबार निधीला बंदी असेल.