कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे.
कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज दि. २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९:०० वा. धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून १०५० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येणार्या येव्या नुसार वक्राकार दरवाजे उघडून सांडव्यावरून देखील नदीपात्रात विसर्ग वाढवला जाऊ शकतो.
धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. तरी नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद घ्यावी.