आटपाडी माण तालुक्याच्या सरहदीवर गर्भश्रीमंतांचा जुगार अड्डा.

👤 आटपाडी प्रतिनिधी | 📅 07 May 2026 | 👁 383 Views
आटपाडी माण तालुक्याच्या सरहदीवर गर्भश्रीमंतांचा जुगार अड्डा.
आटपाडी माण तालुक्याच्या सरहदीवर विरळी रस्त्याला गर्भ श्रीमंतांचा जुगार अड्डा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याबाबत काही प्रसिद्धी माध्यमातून बातम्याही प्रसिद्ध झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की झरे गावच्या उत्तरेला माण तालुक्याच्या सरहद्दीवर मोठ्या प्रमाणामध्ये जुगार अड्डा सुरू आहे. परंतु पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे गडगंज गर्भ श्रीमंती असणारे नागरिक या अड्ड्यावर दिसून येत आहेत. या जुगार अड्या संदर्भात काही प्रसारमाध्यमातून बातमी प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु याकडे कोणीही लक्ष दिले नाही.
या जुगाराड्यावर दररोज मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची उलाढाल होते अशी खात्रीलायक बातमी आहे. हे सर्व उघडपणे सुरू असताना आटपाडी पोलीस करतात तरी काय हा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. तर या जुगार अड्ड्यावर नामवंत व गर्भ श्रीमंती असणारे नागरिक खेळण्यासाठी येतात अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
एवढा मोठा अड्डा सुरू असून सुद्धा पोलीस प्रशासन करतेय तरी काय हा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासनाच्या या कारभाराबद्दल झरे परिसरात कुजबुज सुरू आहे. व अनेक नागरिक पोलीस प्रशासनाच्या कारभाराबद्दल शंका निर्माण करीत आहेत.
फोटो आटपाडी माण तालुक्याच्या सरहद्दीवर सुरू आसलेला जुगार अड्डा
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |