अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त २०१ वृक्षांचे वृक्षारोपण; पाच वर्षे संगोपनाचा अनंत पिळणकर यांचा संकल्प

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 23 June 2026 | 👁 169 Views
अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त २०१ वृक्षांचे वृक्षारोपण; पाच वर्षे संगोपनाचा अनंत पिळणकर यांचा संकल्प
नवीनकुर्ली येथे वन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम; आई कुर्लादेवी व महालक्ष्मी चरणी अमित सामंत यांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमितजी सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त नवीनकुर्ली येथे २०१ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावलेल्या सर्व २०१ वृक्षांचे पुढील पाच वर्षे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प जाहीर केला. पर्यावरण संवर्धनासाठी ही जबाबदारी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
अमित सामंत हे जिल्ह्याचे लाडके नेतृत्व व अनेक कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान असल्याचे सांगत त्यांच्या निरोगी, सुखी व दीर्घायुष्यासाठी आई कुर्लादेवी व आई महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.
या उपक्रमासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) युवक जिल्हा उपाध्यक्ष नयन गावडे, कणकवली उपतालुकाप्रमुख महेश चव्हाण, फोंडा जिल्हा परिषद विभाग प्रमुख रमेश राणे, लोरे येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शाखाप्रमुख निलेश राणे, विशाल राणे, उत्तम तेली, रवींद्र गावडे, अमित लाड, तुषार पिळणकर, प्रकाश पिळणकर तसेच कणकवली तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ए.आय. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा ऊस पिकाचे उत्पादन वाढून भरीव आर्थिक फायदा- हर्षवर्धन पाटील | उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन |