जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे ठरले देवदूत

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 18 June 2026 | 👁 17 Views
जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे ठरले देवदूत
14 वर्षाच्या तन्मयला मिळाले नवे आयुष्य
कणकवली तालुक्यातील नागवे गावातील १४ वर्षीय तन्मय गणेश खेडेकर याच्यासाठी जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे हे मदतीचा आधार ठरले आहेत. लहानपणापासूनच तन्मयला नाक आणि कानामध्ये असलेल्या गाठींमुळे श्वास घेण्यास तसेच ऐकण्यास त्रास होत होता.

तन्मयच्या या समस्येची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांनी तातडीने दखल घेतली. शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च उचलण्याचा निर्णय घेत त्यांनी तन्मयच्या उपचारासाठी पुढाकार घेतला.

कणकवली येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये तन्मयवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे ३० हजार रुपयांचा खर्च आला असून, मनोज रावराणे यांच्या मदतीमुळे तन्मयला मोठा दिलासा मिळाला आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |