समता वारीत अभंगबोध पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

👤 पंढरपुर प्रतिनिधी | 📅 11 May 2026 | 👁 161 Views
समता वारीत अभंगबोध पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रही उपोषण केले होते. या सत्याग्रही उपोषणाची सांगता १० मे १९४७ रोजी झाली. त्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी संतविचार पीठातर्फे पंढरपूरला समता वारीचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या समता वारीत ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर लिखित अभंगबोध या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या पुस्तकात आठ वारकरी संतांच्या पंचवीस अभंगावर निरुपण केलेले आहे. पुस्तकाचे प्रकाशन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, श्रीसंत कैकाडीबाबा मठाचे अधिपती ह.भ.प. भारत महाराज जाधव, ह.भ.प. अच्युत महाराज मोफरे आणि विनायक होगाडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

पुस्तक प्रकाशनानंतर लेखक ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर यांची सुजित काळंगे यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीतून अभंगबोधच्या लिखाणाचा प्रवास उलगडला गेला. डाॅ. श्रीरंग गायकवाड यांनी या पुस्तकावर भाष्य केले. वारकरी संतांच्या अभंगांचे विस्तारपूर्वक चिंतन मनन करुन केलेले हे भाष्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वारकरी संप्रदाय आणि सामाजिक समता या विषयावर चर्चासत्र पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी शिंदे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून भाविक आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजाभाऊ अवसाक, निशिकांत प्रचंडराव, सारंग कोळी, ह.भ.प. सौरभ मुधाळे यांनी परिश्रम घेतले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |