विवेकदादा कोल्हे यांच्या विधानपरिषद नियुक्तीचा कोपरगावात जल्लोष

👤 कोपरगाव प्रतिनिधी : अथर्व वाणी | 📅 09 May 2026 | 👁 68 Views
विवेकदादा कोल्हे यांच्या विधानपरिषद नियुक्तीचा कोपरगावात जल्लोष
कोपरगाव सहकार, उद्योग आणि समाजकारण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विवेकदादा कोल्हे यांची विधानपरिषद सदस्य (आमदार) म्हणून नियुक्ती झाल्याने कोपरगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच औद्योगिक वसाहत कोपरगावचे चेअरमन म्हणून विवेकदादा कोल्हे यांनी केलेल्या विकासकामांमुळे त्यांचे नेतृत्व विशेष चर्चेत राहिले आहे.
या नियुक्तीबद्दल कोपरगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष जितूभाऊ रणशुर आणि सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांनी संजीवनी कार्यस्थळी भेट देऊन विवेकदादा कोल्हे यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी जितूभाऊ रणशुर म्हणाले, “विवेकदादा कोल्हे यांचे सहकार व औद्योगिक क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी असून, त्यांच्या नेतृत्वामुळे कोपरगावच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे.”
प्रदीप आहिरे यांनीही “विवेकदादांचे नेतृत्व आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यामुळेच त्यांना हा सन्मान मिळाला आहे,” असे सांगत शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, उपस्थित कार्यकर्त्यांनी “विवेकदादा कोल्हे साहेबांचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |