नडगीवे नं. १ शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; कृषीदूतांच्या सहभागाने विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 23 June 2026 | 👁 231 Views
नडगीवे नं. १ शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; कृषीदूतांच्या सहभागाने विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले
जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा नडगीवे नं. १ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कृषी महाविद्यालय सांगुळवाडीचे कृषीदूत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका अनिता नरेंद्र पाटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या योगगीतेने संपूर्ण वातावरण योगमय झाले. मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका पाटकर यांनी आजच्या धकाधकीच्या आणि तंत्रज्ञानप्रधान जीवनशैलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढणारा मानसिक ताण लक्षात घेता योगाचे महत्त्व अधोरेखित केले. योग ही केवळ व्यायामाची पद्धत नसून निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य योग सत्राचे संचालन शिक्षक संदीप कदम तसेच कृषीदूत प्रतीक रेगे, अजय सूर्यवंशी, शिवप्रताप देसाई, विघ्नेश सुर्वे, रितेश शिंदे, श्रीदत्त कदम, किशोर पाटील आणि अक्षय शिंदे यांनी केले. आयुष मंत्रालयाने निर्धारित केलेल्या ‘कॉमन योग प्रोटोकॉल’ नुसार ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, त्रिकोणासन, भद्रासन, वज्रासन आणि भुजंगासन यांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना करून दाखविण्यात आली. प्रत्येक आसनाचे आरोग्यदायी फायदे आणि घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
यानंतर अनुलोम-विलोम, कपालभाती आणि भ्रामरी या प्राणायामांचा सराव करण्यात आला. मार्गदर्शित ध्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मानसिक शांतता आणि एकाग्रतेचा अनुभव घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थितांनी दररोज किमान २० मिनिटे योगाभ्यास करण्याची सामूहिक शपथ घेतली.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या यशस्वी उपक्रमासाठी मुख्याध्यापिका अनिता पाटकर, प्रभा अकिवाटे, संदीप कदम, जान्हवी परब तसेच कृषी महाविद्यालय सांगुळवाडीच्या कृषीदूतांनी विशेष परिश्रम घेतले.
"योगातून निरोगी शरीर, शांत मन आणि सुदृढ समाज घडविण्याचा संदेश" या उपक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |