पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते वृक्षारोपण; जिल्हाभर व्यापक वृक्षलागवड मोहिमेला प्रारंभ

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 18 June 2026 | 👁 229 Views
पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते वृक्षारोपण; जिल्हाभर व्यापक वृक्षलागवड मोहिमेला प्रारंभ
पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि हरित सिंधुदुर्गच्या संकल्पनेला अधिक बळकटी देण्यासाठी जिल्ह्यात व्यापक वृक्षलागवड मोहिमेचे नियोजन करण्यात आले असून, या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आला. या मोहिमेद्वारे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून पर्यावरणपूरक विकासाला चालना देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. राणे यांनी वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि पर्यावरणीय आव्हाने लक्षात घेता वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. वृक्षलागवड हा केवळ एक औपचारिक उपक्रम नसून भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरण निर्माण करण्याचा संकल्प आहे. त्यामुळे लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन, संवर्धन आणि जगवणूक यावर विशेष भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणे आणि उपलब्ध शासकीय जागांवर मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जाणार आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
गुरुपौर्णिमेनिमित्त मायणीच्या मातोश्री सरुताई मठात उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन. | महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार २०२६ ने ज्येष्ठ शिक्षिका सौ. नाथलीन पावलू फर्नांडिस यांचा गौरव.. | ए.आय. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा ऊस पिकाचे उत्पादन वाढून भरीव आर्थिक फायदा- हर्षवर्धन पाटील | उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा |