सिंदेवाही महावितरणचा ‘फुसका बार! साधा वारा सुटला की ग्रामीण भागात बत्ती गुल, जनता अंधारात!

👤 सुनिल गेडाम गडचिरोली | 📅 12 June 2026 | 👁 163 Views
सिंदेवाही महावितरणचा ‘फुसका बार! साधा वारा सुटला की ग्रामीण भागात बत्ती गुल, जनता अंधारात!
सिंदेवाही तालुक्यातील महावितरणचा कारभार सध्या पुरता कोलमडला असून, ग्रामीण भागातील जनतेच्या नशिबी रात्री-अंंधारात फक्त डास आणि उकाडा सहन करणेच उरले आहे.साधा वारा सुटला किंवा हलकासा पाऊस जरी आला तरी ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित केल्या जातो ,महावितरण ला वीज पुरवठा खंडित करण्याची आठवण राहते पण वादळ शांत झालं की मग ते वीज पुरवठा सुरू करण्याची आठवण च राहत नाही,त्यामुळे ग्रामीण भागात सध्या कित्येक तास अंधारात रहावे लागते तर कधी संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागते या उलट शहरी भागात मात्र वादळ वारा किंवा पाऊस पडत असला तरी वीज पुरवठा सुरळीत असतो आज च्या काळात सिंदेवाही महावितरण विभागाचा असा झोलझेंडी कारभार सुरू आहे,
कधीकाळी याच तालुक्यात आपल्या कर्तव्याचा दणदणीत ठसा उमटवणारे इंजिनीयर 'सहारे साहेब' बदली होऊन गेले आणि जणू सिंदेवाहीच्या ग्रामीण भागाला महावितरणचे ग्रहणच लागले! सध्याच्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या 'ढिम्म' आणि नाकर्त्या वृत्तीमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील
वीज यंत्रणा पूर्णपणे 'सपशेल फेल' ठरली असून, जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आज च्या काळात
सिंदेवाही तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती एवढी भयानक झाली आहे की, आभाळ जरासं गरजलं किंवा साधा सुसाट वारा सुटला, तरी महावितरणची यंत्रणा एखाद्या कुत्र्याने टांग वर करावी तशी कंबरडी मोडून गपगार पडते,
"हवा सुटली की तुमची 'पावर' जाते कुठे सरकून?
सामान्य जनता घरात बसलीय अंधारात सडून!
लाज वाटू द्या थोडी, बिल घ्यायला येता दारात,
आणि स्वतः मात्र झोपता एसीच्या थंड गारात!"
साधा पाऊस येण्याच्या आधीच येथील वीज पुरवठा गायब होतो. त्यानंतर रात्र-रात्र ग्रामीण भागातील लहान मुले, वृद्ध आणि सामान्य जनतेला डासांच्या डंखात आणि उकाड्यात अंधारात चाचपडत राहावे लागते.
ग्रामीण भागातील नागरिक आता म्हणायला लागले की
"आम्ही विजेचे बिल वेळेवर भरतो, मग आम्हाला ही 'अंधारयुगाची' शिक्षा का? महावितरणचे नवीन अधिकारी फक्त खुर्च्या उबवण्यासाठी आणि स्वतःचे खिसे भरण्यासाठी आले आहेत का?"

सहारे साहेबांचा तो 'सुवर्णकाळ' आणि आजचा 'मसाणकाळ'!

काही काळापूर्वी जेव्हा सहारे साहेब सिंदेवाही महावितरणमध्ये इंजिनीयर म्हणून रुजू होते, तेव्हा वादळ-वारा असो की मुसळधार पाऊस, ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांच्या हितासाठी ते स्वतः मैदानात उतरायचे.
त्यांच्या काळात: ग्रामीण भागाचा वीज पुरवठा नेहमी सुरळीत असायचा.
तत्परता: चुकून जरी वीज गेली, तरी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ती तातडीने युद्धपातळीवर सुरू केली जायची.
त्यांनी आपल्या कामाचा असा काही झणझणीत ठसा उमटवला होता की, आज पावला पावलावर ग्रामीण जनतेला त्यांची आठवण येत आहे. पण आजचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र एसी केबिनमध्ये आणि पंख्याखाली बसून मज्जा मारत आहेत.
"सहारे साहेब होते वाघ, त्यांनी राखली तालुक्याची शान,
आजचे अधिकारी मात्र घालवत आहेत महावितरणची अब्रू आणि मान!
फोन केला तर उचलत नाही, लायनमन गायब असतो गल्लीत,
सध्याच्या परिस्थितीत ग्रामीण भागात वीज असली काय आणि नसली काय, महावितरणला त्याचे काहीही सोयरसुतक उरलेले नाही. वीज नसतानाही बिलाचा आकडा मात्र गगनाला भिडलेला असतो. सेवा देण्याच्या नावावर शून्य असलेल्या या विभागाला बिल वसुलीसाठी मात्र दारात उभे राहायला लाज वाटत नाही!
"लाईट द्यायला हवी तत्पर, तिथे तुमची बत्ती गुल,
बिल वसूल करायला मात्र, तुमचे पाय होतात आतूर!
वीज पुरवठा सुरळीत ठेवता येत नसेल, तर या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या खुर्च्या रिकाम्या कराव्यात आणि पगाराचे पैसे घेण्याचे बंद करावे,
आता तरी वरिष्ठ अधिकारी आणि सुस्त कर्मचारी झोपेतून जागे होऊन या ढिसाळ कारभाराला चाप लावणार का?
नाहीतर सहारे साहेब यांना सिंदेवाही तालुक्यात पुन्हा घेऊन यावे किंवा त्यांच्या कडून शिकून घ्यावे ही अपेक्षा .
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |