पालकमंत्री नितेश राणेंची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 23 June 2026 | 👁 196 Views
पालकमंत्री नितेश राणेंची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट
महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट देत ओसरगाव टोल संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जिल्ह्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन ओसरगाव टोल नाक्यावर एमएच-०७ क्रमांकाच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन उपलब्ध करून देत विशेष सवलत देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तर पिवळी पाटी असणाऱ्या व्यावसायिक गाड्यांना 50 टक्के सवलत दिली असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
आपल्या वाढदिवसानिमित्त जनतेशी संवाद साधताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने राणे कुटुंबीयांना आणि भारतीय जनता पक्षाला नेहमीच भरभरून आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जनतेसाठी काहीतरी देण्याची भावना मनात होती. जनतेची सेवा करणे आणि त्यांच्या प्रत्येक अडचणीसाठी लढणे हेच आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
ओसरगाव टोलच्या मुद्द्यावर जिल्ह्यातील नागरिक,व्यावसायिक यांनी टोल माफीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आपण सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करताना ओसरगाव टोल नाक्यावर एमएच-०७ क्रमांकाच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन उपलब्ध करून दिली जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे जिल्ह्यातील वाहनधारकांना कोणत्याही अडचणी शिवाय प्रवास करता येणार आहे.
याशिवाय पिवळ्या क्रमांकाच्या (व्यावसायिक) वाहनांसाठी संबंधित कंपनीने टोल दरात ५० टक्के सवलत जाहीर केल्याची माहितीही त्यांनी दिली. हा निर्णय जिल्ह्यातील व्यावसायिक आणि वाहतूक क्षेत्रासाठी दिलासादायक ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या निर्णयासाठी सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुनेत्रा पवार तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे नितेश राणे यांनी आभार मानले.
"माझ्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्याच्या जनतेच्या मनातील एक महत्त्वाचा प्रश्न सोडविण्यात यश आले, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे," असे सांगत त्यांनी सिंधुदुर्गवासीयांनी एमएच-०७ क्रमांकाच्या वाहनांचा वापर करून,निर्माण केलेल्या स्वतंत्र लेनचा वापर करावा असे आवाहन केले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ए.आय. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा ऊस पिकाचे उत्पादन वाढून भरीव आर्थिक फायदा- हर्षवर्धन पाटील | उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन |