सिंधुदुर्गात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी वेगवान; रुपेश राऊळ व सुशांत नाईक यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 14 June 2026 | 👁 338 Views
सिंधुदुर्गात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी वेगवान; रुपेश राऊळ व सुशांत नाईक यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी
विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर महत्त्वपूर्ण फेरबदल करत पक्षबांधणीला गती देण्यास सुरुवात केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या फेरबदलांनुसार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदी रुपेश राऊळ यांची पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली आहे. तर युवासेनेचे आक्रमक व कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असलेले नेते सुशांत नाईक यांच्यावर थेट कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षाच्या आगामी निवडणूक रणनीतीच्या दृष्टीने या नियुक्त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, जिल्ह्यातील संघटन अधिक सक्षम करण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांनी तळागाळात काम करण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्या आहेत.दरम्यान, माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक तसेच माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षबांधणी अधिक वेगाने राबविण्याचे आदेश नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवून आगामी निवडणुकांसाठी मजबूत यंत्रणा उभी करण्याच्या दृष्टीने या नियुक्त्या महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. पक्ष कार्यकर्त्यांमध्येही या निर्णयाचे स्वागत होत असून, येत्या काळात मतदारसंघनिहाय संघटन विस्तारावर भर दिला जाणार असल्याची माहिती पक्ष सूत्रांकडून मिळाली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |