शिवसेना पक्षाच्या नाटळ विभागप्रमुख पदी गुरुनाथ पेडणेकर यांची नियुक्ती
👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग |
📅
26 June 2026 |
👁 135 Views
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली तालुक्यातील नाटळ विभागप्रमुख पदी गुरुनाथ पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते नियुक्त पत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, तालुका संघटक राजू राठोड, शहरप्रमुख महेश कोदे, नगरसेवक संकेत नाईक, नगरसेवक जयेश धुमाळे, तेजस राणे, विलास गुडेकर, धीरज मेस्त्री, हरकूळ बु. विभागप्रमुख ओमप्रकाश तामाणेकर,आपा तावडे,बबली राणे,सुनील गावकर,चेतन गुरव,प्रतीक रासम,फैयाज खान,आनंद महाडेश्वर, मोहन तांबे आदी उपस्थित होते.