रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस

👤 पुणे बापूसाहेब नामदास | 📅 09 June 2026 | 👁 187 Views
रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस
पुणे प्रतिनिधी :बापूसाहेब नामदास
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रेड झोन क्षेत्राची सीमा तातडीने निश्चित करून जाहीर करावी, अशी मागणी नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रेड झोन क्षेत्राची आवश्यक मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी अद्याप अंतिम सीमा निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक, मालमत्ता धारक तसेच विकासकामांचे नियोजन करणाऱ्या संबंधित घटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सीमा निश्चित नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून विविध प्रशासकीय कामेही प्रलंबित राहत आहेत. तसेच मालमत्तांच्या व्यवहारांवर आणि विकासकामांच्या नियोजनावर त्याचा परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
महापालिकेने पूर्ण झालेल्या मोजणीच्या आधारे रेड झोनची अंतिम सीमा तातडीने जाहीर करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी ऐश्वर्या तरस यांनी केली आहे.
या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |