मराठा समाजाच्या आंदोलनाला मोठे यश

👤 संकेत तुकाराम सानप ( मुंबई ) | 📅 15 May 2026 | 👁 283 Views
मराठा समाजाच्या आंदोलनाला मोठे यश
परळी वैजनाथ येथे मराठा भवनासाठी २८ गुंठे जागा मंजूर
परळी वैजनाथ येथे मराठा भवनासाठी २८ गुंठे जागा मंजूर धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश
परळी वैजनाथ शहरात मराठा भवन उभारण्यात यावे, ही सकल मराठा समाजाची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्णत्वाकडे वाटचाल करू लागली आहे. परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या वतीने मराठा भवनासाठी तब्बल २८ गुंठे जागा मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, समाजाच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
मराठा समाजाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर व आंदोलनानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या प्रक्रियेत पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे तसेच नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परळी वैजनाथ नगरपरिषदेने मराठा भवनासाठी जागा उपलब्ध करून दिली.
मराठा भवनाच्या माध्यमातून समाजासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळणार असून, भविष्यात हे भवन समाजाच्या एकतेचे व प्रगतीचे केंद्र ठरणार असल्याचे समाजबांधवांनी सांगितले.
या निर्णयाबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले असून, आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व समाजबांधवांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच आंदोलनकर्त्यांच्या संघर्षाला मानाचा मुजरा करण्यात आला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |