पालकमंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांसमवेत घेतला ‘मन की बात’मधील प्रेरणादायी संदेशांचा अनुभव

👤 सांगली प्रतिनिधी | 📅 28 June 2026 | 👁 378 Views
पालकमंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांसमवेत घेतला  ‘मन की बात’मधील प्रेरणादायी संदेशांचा अनुभव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय मासिक कार्यक्रमाचा 125 वा भाग पालकमंत्री महोदयांनी आज जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत दूरदर्शनवर पाहिला. कार्यक्रमातील समाजजागृती, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, नवकल्पना, जलसंधारण आणि राष्ट्रविकासातील जनसहभाग यांसारख्या विषयांवरील संदेशांचा आढावा घेत, शासनाच्या विकासाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.



यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदिंसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून व्यक्त केलेल्या विचारांतून समाजातील सकारात्मक उपक्रम, पर्यावरण संवर्धन, नवकल्पना, स्वच्छता, जलसंधारण, महिला सक्षमीकरण, युवा सहभाग तसेच देशाच्या विकासासाठी नागरिकांनी दिलेल्या योगदानाबाबत विचारांची माहिती उपस्थितांना मिळाली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |