पावसाचा प्रत्येक थेंब जपण्याचा संकल्प !

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 14 June 2026 | 👁 299 Views
पावसाचा प्रत्येक थेंब जपण्याचा संकल्प !
रेन वॉटर हार्वेस्टिंग व सोलर प्रणालीसाठी घरपट्टीत अतिरिक्त ५ टक्के सवलत; कुणकेश्वर ग्रामपंचायतीचा महत्त्वाकांक्षी निर्णय
पर्यावरण संरक्षण, जलसंवर्धन आणि अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी कुणकेश्वर ग्रामपंचायतीने महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. छतावरील पावसाचे पाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने संकलित करून भूजल पुनर्भरण करणारी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली तसेच एक किलोवॅटपेक्षा अधिक क्षमतेची सोलर ऑन-ग्रीड प्रणाली कार्यान्वित करणाऱ्या करदात्यांना घरपट्टीमध्ये अतिरिक्त ५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हवामानातील बदल, अल निनोचा संभाव्य प्रभाव, घटते पर्जन्यमान आणि भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. कोकणात भरपूर पाऊस पडत असला तरी एप्रिल-मे महिन्यात अनेक भागांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. देवगड तालुक्यातील कातळमय भूभागामुळे भूजल साठ्यांवरही मर्यादा येतात. त्यामुळे पावसाचे पाणी साठविणे व जमिनीत मुरविणे आवश्यक असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे.
यासोबतच सप्टेंबर २०२६ पूर्वी घरपट्टी भरणाऱ्या सर्व करदात्यांसाठी नियमित ५ टक्के करसवलतही सुरू ठेवण्यात आली आहे. जलसंवर्धन आणि ऊर्जा बचतीबाबत गावकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करून पर्यावरणपूरक विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासक, कुणकेश्वर ग्रामपंचायत यांच्या वतीने सांगण्यात आले.
गावाचा सर्वांगीण विकास हा लोकसहभागातूनच शक्य असून प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |