महायुती सरकारने नुकसानग्रस्त आंबा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली- वैभव नाईक

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 May 2026 | 👁 273 Views
महायुती सरकारने नुकसानग्रस्त आंबा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली- वैभव नाईक
सर्वांनी मिळून काम केले तर देवगड मध्ये पुन्हा शिवसेना उभी राहील-सुशांत नाईक* देवगड तालुका शिवसेनेची बैठक संपन्न;जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा केला सत्कार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकरी रस्त्यावर उतरून देखील आंबा आणि काजू पिकांची नुकसान भरपाई मिळालेली नाही. महायुती सरकारने नुकसानग्रस्त आंबा शेतकऱ्यांच्या तोंडाला अक्षरशः पाने फुसली आहेत. जलजीवन मिशन योजनेचे एकही नवीन काम जिल्ह्यात पूर्ण झालेले नाही. गतवर्षी अतिवृष्टीमुळे भातशेतीची झालेली नुकसान भरपाई अजूनही मिळाली नाही. निकृष्ट दर्जाची कामे केली जात आहेत. वाळू लिलाव न झाल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. अदानीच्या स्मार्ट मीटरचे भरमसाठ लाईट बिल येत आहे. हे प्रश्न सोडविण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. याविरोधात आपल्याला आवाज उठवायचा आहे.लोक आपल्यासोबत आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहचले पाहिजे. या मतदारसंघात युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी संघटना वाढीसाठी मेहनत घ्या.आपल्या सर्वांच्या पाठीशी मी खंबीर आहे. असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख,माजी आमदार वैभव नाईक यांनी देवगड येथे बोलताना दिला.
देवगड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक आज देवगड येथे संपन्न झाली. शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी वैभव नाईक यांची निवड झाल्याबद्दल देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिंदाबाद! बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो! वैभव नाईक तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है! अशी घोषणाबाजी करण्यात आली.
सुशांत नाईक म्हणाले, शिवसेना संघटना वाढविणे हि कोणा एकट्याची जबाबदारी नाही. वैभव नाईक यांच्यासारखे चांगले नेतृत्व आपल्याला लाभले आहे. आपण सर्वांनी मिळून काम केले तर पुन्हा याठिकाणी शिवसेना उभी राहील. आपल्यासारख्या कट्टर शिवसैनिकांनी आज आपली संघटना टिकवली आहे. बाळासाहेबांचे विचार जोपासणारे नागरिक आणि शिवसैनिक याठिकाणी आहेत.आपण त्यांना विश्वास दिला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी सभापती, शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, महिला आघाडी प्रमुख हर्षा ठाकूर, उपतालुकाप्रमुख सुनील तेली, उपतालुका प्रमुख विष्णू सावंत, विभागप्रमुख विकास कोयंडे,रमाकांत राणे, दिनेश पारकर,राजाराम गावकर,सुधीर जाधव, उपतालुका प्रमुख विष्णू सावंत,महेंद्र परब,गणेश कांबळी,काका आरे,महेंद्र भुजबळ,गणेश कावले,सीमा धुरी,गणेश वाळके,उदय करंगुटकर,बाळ मुणगेकर,मंगेश फाटक,विलास मालंडकर,केतन खाडये,लोकेश माणगावकर,शिवदास नरे, सचिन खडपे,शरद घाडी,धनंजय जोशी, तुकाराम गावकर,अमित फणसेकर,विशाल मांजरेकर, राजीव वाळके,सतीश थोटम,मनीष कांबळी, मालोजी पुजारे,संतोष लाड,विजय कुळकर आदी उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |