आचिर्णे येथे रविवार दि .१४/६/२०२६ रोजी १८ वा दुर्गाडी दर्शन सोहळा

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 13 June 2026 | 👁 300 Views
आचिर्णे येथे रविवार दि .१४/६/२०२६ रोजी १८ वा दुर्गाडी दर्शन सोहळा
वैभववाडी तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या आचिर्णे, लोरे, कुर्ली, अरुळे व खांबाळे या पाच गावातील दुर्गाडी डोंगराचे क्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून विकासित व्हावे या उद्देशाने आचिर्णे गावातील ग्रामस्थांनी एकत्र येवून दुर्गाडी विकास मंडळाची स्थापना केली. उद्देश पूर्तीसाठी मंडळ दरवर्षी पावसाळ्यात सहल आयोजित करते. सर्व पर्यटकांनी दिनांक 14/6/2026 रोजी सकाळी 12 वाजता आचिर्णे (धनगरवाडी) येथे एकत्रित व्हावे. ज्यांना वाहनाने यावयाचे आहे त्यांनी माळवाडी-मोईनवाडी मार्गे धनगरवाडी असा प्रवास करून येणे. ज्यांना पाई चालत यावयाचे आहे त्यांनी खरलावर गवळदेवाजवळ सकाळी 10 वाजता एकत्र जमावे. पर्यटकांची नोंदणी करण्यात येईल. त्यानंतर पर्यटनाच्या कार्यक्रमास सुरुवात होईल. देवराई येथील गांगो-हंगोबा, ब्राह्मण, रामेश्वर या देवांचे दर्शन घेऊन धनगरवाडी मार्गे दुर्गाडीच्या शिखरावर जाऊन तेथे न्याहरी करण्यात येईल. दुपारचे जेवण श्री. विठ्ठल हुंबे यांच्या घरी बनविण्यात येणार आहे. भोजनानंतर धनगरवाडी येथे कार्यक्रमाची सांगता होईल. पर्यटकांनी आपल्या सोबत पुरेसे पाणी, आधारासाठी काठी व सकाळची न्याहारी घेऊन यावे.
असे आवाहन दुर्गाडी विकास मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
गुरुपौर्णिमेनिमित्त मायणीच्या मातोश्री सरुताई मठात उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन. | महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार २०२६ ने ज्येष्ठ शिक्षिका सौ. नाथलीन पावलू फर्नांडिस यांचा गौरव.. | ए.आय. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा ऊस पिकाचे उत्पादन वाढून भरीव आर्थिक फायदा- हर्षवर्धन पाटील | उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा |