कोकण रेल्वे प्रकल्पातील प्रलंबित प्रकल्प बाधितांना रोजगारात प्राधान्य द्या

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 May 2026 | 👁 193 Views
कोकण रेल्वे प्रकल्पातील प्रलंबित प्रकल्प बाधितांना रोजगारात प्राधान्य द्या
कोकण रेल्वे प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांच्या संपादित झालेल्या जमिनींच्या बदल्यात त्यांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी रेल्वे प्रशासनाला दिले.रेल्वे स्थानकांवरील स्टॉल व अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना सामावून घ्या मंत्री नितेश राणे
मंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. बैठकीस कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा, मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर उपस्थित होते.

"कोकण रेल्वे प्रकल्पासाठी अनेक स्थानिक नागरिकांच्या जमिनी संपादित झाल्यानंतरही त्यांना अद्याप रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या नसून याबाबत रेल्वे प्रशासनाने बाधित नागरिकांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

तसेच रेल्वे स्थानकांवरील स्टॉल वाटप, सुविधा केंद्रे तसेच अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्यांमध्ये प्रकल्पबाधितांना प्राधान्य देण्याबाबत रेल्वे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी असे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |