शिष्यवृत्ती परीक्षेत मिलिंद सदानंद पवार शाळेचे घवघवीत यश

👤 तुषार शिंगाडे | 📅 12 August 2026 | 👁 74 Views
शिष्यवृत्ती परीक्षेत मिलिंद सदानंद पवार शाळेचे घवघवीत यश


देवगड (प्रतिनिधी) : एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत देवगड येथील मिलिंद सदानंद पवार पूर्व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेच्या पाच विद्यार्थ्यांनी यश मिळवत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.

या यशामध्ये कु. अनुश्री स्वप्निल पवार हिने ८४ टक्के गुण मिळवून देवगड तालुक्यात प्रथम क्रमांक, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात नववा क्रमांक मिळवला आहे.

कु. वर्धन निवास शिंदे याने ७९.३३ टक्के गुणांसह तालुक्यात चौथा व जिल्ह्यात २१वा क्रमांक, तर कु. आराध्य उदय परब याने ७९.३३ टक्के गुणांसह तालुक्यात पाचवा व जिल्ह्यात २२वा क्रमांक पटकावला.

तसेच कु. रोशन केदार सावंत याने ७४.६६ टक्के गुण मिळवून तालुक्यात सहावा व जिल्ह्यात ४३वा क्रमांक, तर कु. सुखदा सुमित नार्वेकर हिने ७४ टक्के गुणांसह तालुक्यात सातवा व जिल्ह्यात ४७वा क्रमांक मिळवत यश संपादन केले.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण खडपकर, शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे, सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
युगा कानडेच्या निधनाने हळहळ; वैभव नाईक यांच्याकडून कुटुंबीयांचे सांत्वन | पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली कणकवलीत १४ ऑगस्टला भव्य तिरंगा रॅली | शिष्यवृत्ती परीक्षेत मिलिंद सदानंद पवार शाळेचे घवघवीत यश | वैभववाडीत जनशताब्दी, नेत्रावती एक्सप्रेसला थांबा द्या : सभापती सिद्धेश रावराणे | मुंबई–सावंतवाडी नव्या रेल्वे सेवेमुळे वैभववाडीकरांना मोठा दिलासा | हुबालवाडी चा राजवर्धन चमकला राज्यात | काळ्या यादीतील कंपनीला स्वच्छता ठेका देऊ नका’-शिवसेनेची मागणी | सिंधुदुर्गातील फळपीक विमा नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा! | मालवणी खाद्यसंस्कृतीला ‘ब्रँड’ची ओळख द्या; महिला बचत गटांनी व्यावसायिक भरारी घ्यावी – नगराध्यक्ष संदेश पारकर | स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचा त्याग नव्या पिढीसाठी प्रेरणादायी: प्रभारी प्राचार्य प्रा. कृष्णा के. रानगर |