पाटगावाव ( मिरज ) खून प्रकरणातील तीन आरोपी १२ तासात पोलिसांच्या जाळ्यात
👤 संतोष एडके तासगाव |
📅
09 August 2026 |
👁 91 Views
पाटगाव, ता. मिरज येथे जुन्या वादाचा राग मनात धरून एका व्यक्तीवर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला करून ठार मारले च्या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीच्या टीमने १२ तासांच्या आत जेरबंद केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली राजेश ऊर्फ साहेबराव पाटील, वय २७ वर्षे, रा. पाटगाव, ता. मिरज, जि. सांगली. यांच्यावर डोक्यात, मानेवर तसेच हातावर धारदार कोयत्याने वार ठार मारले ची फिर्याद .सुशांत सुरेश पाटील, रा. खणभाग, फाटगाव, ता. मिरज. जि. सांगली. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊनसदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, मा. अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांना सदर गुन्ह्यातील
आरोपीचा शोध घेवून तात्काळ अटक करणेबाबत आदेशीत केले होते.
सदर आदेशान्वये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी पोलीस उप निरीक्षक महादेव पोवार व स्टाफ यांचे पथक तयार करून सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
त्या अनुशंगाने पोलीस उप-निरीक्षक महादेव पोवार यांचे पथक सदर गुन्हयातील संशयीत आरोपींचा तांत्रीक व गोपनिय बातमीच्या आधारे शोध घेत असतना पथकातील पोलीस अंमलदार सुनिल जाधव, संकेत मगदुम, अतुल माने, इम्रान मुल्ला आणि सुशील मस्के यांना पाटगाव येथील खुनाच्या गुन्हयातील संशयीत आरोपी हे गडदोबा डोंगराजवळ डाकोबा खिंड परीसरात लपुन बसलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
सदर माहितीच्या अनुषंगाने पोउपनि महादेव पोवार यांचे पथकाने नमूद ठिकाणी जाऊन १) अक्षय पांडुरंग माने, वय ३० वर्षे, रा. हनुमान मंदीर जवळ, योगेवाडी, ता. तासगाव, जि. सांगली. २) सर्वेश सुर्यकांत देशमुख, वय १९ वर्षे, रा. ग्रामपंचायत जवळ, करोली (एम), ता. मिरज, जि. सांगली. ३) विक्की ऊर्फ धनराज मधुसुदन पवार, यय २३ वर्षे, रा. वडर गल्ली, करोली (एम), ता. मिरज, जि. सांगली यांना ताब्यात घेतले.
पोउपनि महादेव पोवार यांनी त्यांचेकडे खुनाच्या गुन्हयाच्या अनुशंगाने चौकशी केली असता त्यांनी सांगीतले की, मयत इसम नामे ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली राजेश ऊर्फ साहेबराव पाटील, रा. पाटगाव, ता. मिरज, जि. सांगली याचेसोबत बेदराच्या दिवशी डोंगरवाडी येथे बैलगाडी शर्यत बघुन येताना झालेल्या वादाच्या तसेच करोली एम येथे झालेल्या मारहाणीच्या किरकोळ कारणाचा राग मनात धरुन लोखंडी कोयत्याने डोक्यात व मानेवर वार करून त्यांनी मिळून खुन केला असल्याची कबुली दिली.
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. श्रीमती कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली,
यांचे मार्गदर्शानाखाली
पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्था. गु. अ. शाखा, सांगली, सहा पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोलीस उप निरीक्षक महादेव पोवार, स्था. गु. अ. शाखा, सांगली
पोहेकों / संकेत मगदुम, अतुल माने, इम्रान मुल्ला, सुशील मस्के. पोकों/ सुनिल जाधव, सुरज थोरात.
सायबर पोलीस ठाणे, सांगली कडील कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर,
या यशस्वी कारवाईनंतर पुढील तपास कामी
आरोपी क्रं. १ ते ३ यांना मिरज ग्रामीण पोलीस ठाणेच्या ताब्यात दिले असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक विक्रांत संकपाळ, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हे करीत आहे.
सदर आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने दि. १४/०८/२०२६ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केले आहे. पुढील तपास हा मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या कडून केला जात आहे