राष्ट्रवादी काँग्रेस विचार मंचाच्या पुणे शहर जिल्हाध्यक्षपदी दीपक भोंई यांची नियुक्ती

👤 संकेत सानप मुंबई | 📅 23 July 2026 | 👁 329 Views
राष्ट्रवादी काँग्रेस विचार मंचाच्या पुणे शहर जिल्हाध्यक्षपदी दीपक भोंई यांची नियुक्ती
| पुणे.प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस विचार मंच (महाराष्ट्र प्रदेश) यांच्या वतीने असंघटित कामगार आघाडीच्या पुणे जिल्हा (शहर) जिल्हाध्यक्ष पदावर श्रीयुत दीपक उत्तम भोंई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र राज्य प्रमुख विलास पारखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
दीपक भोंई यांनी सामाजिक, कामगार व जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली असंघटित कामगारांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस विचार मंचाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवून संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी दीपक भोंई यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, "संघटनेने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरत कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करणार," अशी ग्वाही दिली.
त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध राजकीय, सामाजिक आणि कामगार क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा | मा. संजय काटकर (IAS) यांचा उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे संवाद दौरा; ग्रामीण आरोग्य सेवांना गती देण्याचे निर्देश | जिल्हा सत्र,वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी कवठे महांकाळ वकील संघटना आक्रमक.उपोषणाचा इशारा |