सरूड-बांबवडे परिसरातील तरुणांना उद्योजकतेची नवी संधी; अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मंजुरीपत्रांचे वितरण"

👤 प्रदीप जानकर शाहुवाडी | 📅 18 July 2026 | 👁 323 Views
सरूड-बांबवडे परिसरातील तरुणांना उद्योजकतेची नवी संधी; अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मंजुरीपत्रांचे वितरण"
महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वितरण माजी आमदार सत्यजित पाटील (आबा) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड प्रमुख उपस्थित होते.
या योजनांमुळे सरूड व बांबवडे परिसरातील मराठा समाजासह स्वतंत्र महामंडळाची सुविधा नसलेल्या इतर खुल्या प्रवर्गातील तरुण-तरुणींना स्वयंरोजगार, नवीन उद्योग आणि व्यवसाय उभारणीसाठी मोठा आर्थिक आधार मिळणार असून, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार आहे.
महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रमुख योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (₹15 लाखांपर्यंत), गट/उद्योग कर्ज व्याज परतावा योजना (₹50 लाखांपर्यंत) तसेच गट कर्ज योजना यांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर व व्यावसायिक वाहनांसाठी घेतलेल्या ₹15 लाखांपर्यंतच्या बँक कर्जावरही व्याज परतावा दिला जातो.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीप पाटील, पंचायत समिती सदस्य बाबुराव पाटील, गटनेते व सदस्य अभयसिंह चौगुले तसेच डॉ. जयवंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
लाभार्थ्यांनी शासनाच्या या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन स्वतःचा उद्योग उभारावा आणि रोजगारनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी यावेळी केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप |