शांताबाई माने यांच्या उपोषणाला मिळाला पाठिंबा; शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी सर्वपक्षीय एकजूट

👤 संकेत तुकाराम सानप ( मुंबई मंत्रालय) | 📅 30 May 2026 | 👁 217 Views
शांताबाई माने यांच्या उपोषणाला मिळाला पाठिंबा; शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी सर्वपक्षीय एकजूट
गुंजेगाव (प्रतिनिधी) – मौजे सज्जा गुंजेगाव व राणीसावरगाव मंडळातील शेतकऱ्यांना सन २०२५-२६ चा खरीप पीक विमा लागू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी पंचायत समिती सदस्या श्रीमती शांताबाई देवराव माने यांनी केलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला विविध लोकप्रतिनिधींनी भेट देत पाठिंबा दर्शविला.
उपोषणस्थळी भेट देऊन संबंधित समस्या जाणून घेतल्यानंतर प्रशासनाशी तत्काळ संपर्क साधण्यात आला. यावेळी मा. तहसीलदार मॅडम यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली. तसेच श्रीमती माने व शासन यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका बजावत शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
या संदर्भात मा. तहसीलदार मॅडम यांनी नायब तहसीलदार व संबंधित केंद्र अधिकाऱ्यांना उपोषणस्थळी पाठवून सर्व माहिती जाणून घेतली. तसेच पीक विम्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, "शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आम्ही कायम त्यांच्या पाठीशी आहोत. भविष्यात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आमची संपूर्ण टीम शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभी राहील," असे आश्वासन देण्यात आले.
उपोषणस्थळी पंचायत समिती उपसभापती खांडेकर सर, पंचायत समिती सदस्य श्रीकांत गायकवाड, पंचायत समिती सदस्य धम्मा पवार यांच्यासह गुंजेगाव व राणीसावरगाव मंडळातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खरीप पीक विम्याच्या प्रश्नावर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच या मागण्यांवर निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |