‘माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत व्हायरल बातमी खोटी; प्रशासनाचा खुलासा

👤 अतुल फसाले | 📅 20 May 2026 | 👁 164 Views
‘माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत व्हायरल बातमी खोटी; प्रशासनाचा खुलासा

सोलापूर : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेबाबत सोशल मीडियावर आणि काही प्रसारमाध्यमांच्या नावाने फिरत असलेली बातमी पूर्णपणे खोटी असल्याचा खुलासा सोलापूर जिल्हा प्रशासनाने केला आहे. शासनाकडून अशाप्रकारचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गेल्या काही तासांपासून “ई-केवायसी न केलेल्या महिलांनी तातडीने महिला व बाल विकास विभागात कागदपत्रे सादर करावीत, ही शेवटची संधी आहे,” असा दावा करणारी बातमी मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. ‘झी २४ तास’ आणि ‘लोकसत्ता’ यांच्या नावाने ही माहिती प्रसारित करण्यात आल्याने अनेक लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
या अफवेचा परिणाम म्हणून सोलापूर शहरासह तालुकास्तरावरील महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांबाहेर महिलांची मोठी गर्दी झाली. अनेक महिला आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयात दाखल झाल्याने प्रशासनाची धावपळ उडाली.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अविनाश मगर यांनी अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करत वस्तुस्थिती स्पष्ट केली.
त्यांनी सांगितले की, “ई-केवायसी न केलेल्या महिलांनी जिल्हा महिला व बाल विकास विभागात कागदपत्रे जमा करावीत, असे कोणतेही निर्देश शासन स्तरावरून देण्यात आलेले नाहीत. सोशल मीडियावर फिरणारी बातमी चुकीची असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये.”
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही अधिकृत माहिती संबंधित शासकीय कार्यालय किंवा अधिकृत माध्यमांतूनच तपासून घ्यावी, तसेच चुकीच्या बातम्यांमुळे कार्यालयांमध्ये अनावश्यक गर्दी करू नये, असे प्रशासनाने म्हटले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |