सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीसाठी एकूण 616 मतदार

👤 अतुल फसाले | 📅 22 May 2026 | 👁 146 Views
सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीसाठी एकूण 616 मतदार
भारत निवडणूक आयोगाने दिनांक 18 मे 2026 अन्वये महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक 2026 करीता कार्यक्रम जाहीर केला आहे. सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद सोलापूर, सोलापूर महानगरपालिका तसेच 17 नगरपरिषद व नगरपंचायती अशा एकूण 19 स्थानिक प्राधिकारी संस्था असून त्यांची एकूण मतदार संख्या 616 आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली आहे.

या 616 मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आलेली असून ती जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती तसेच सर्व नगरपरिषद व नगरपंचायत कार्यालयात कार्यालयीन वेळेत तपासणीसाठी उपलब्ध आहे.

मतदार यादीतील नावाबाबत किंवा समावेशाबाबत कोणताही आक्षेप असल्यास तो दिनांक 27 मे 2026 पूर्वी फॉर्म क्रमांक 17, 7 किंवा 8 मध्ये नोंदवून जिल्हाधिकारी कार्यालय, सहायक मतदार नोंदणी अधिकारी (निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर) यांच्या कार्यालयात सादर करावा किंवा टपालाने पाठवावा. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक 0217-2731012 असा आहे, असे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव |