सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा – नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

👤 अतुल फसाले | 📅 20 May 2026 | 👁 197 Views
सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा – नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
सोलापूर जिल्ह्यास दररोज सुमारे 624 KL पेट्रोल व 1240 KL डिझेलची आवश्यकता भासते. त्यानुसार पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरून इंधन साठवणूक करू नये.
सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा – नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

सोलापूर,(जिमाका) दि. २० ::- जिल्ह्यातील तीन प्रमुख कंपन्या – HPCL, BPCL व IOCL यांच्याकडून नियमित पेट्रोल व डिझेल पुरवठा सुरू असून सात दिवसांचा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी कोणतीही काळजी करू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले आहे.

आढावा बैठक
जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी HPCL, BPCL व IOCL या तेल कंपन्यांच्या डेपो व्यवस्थापक व विक्री अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेल साठा व वितरण व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे तसेच संबंधित कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रशासनाच्या सूचना
- पेट्रोलपंप चालकांकडून इंधनाचे पूर्ण देयक प्राप्त झाल्यानंतरच वितरण करावे.
- काळाबाजार रोखण्यासाठी वाहनाशिवाय प्लास्टिक ड्रम किंवा बाटल्यांमध्ये इंधन मागणाऱ्या ग्राहकांची नोंद ठेवावी.
- ग्राहकांचे नाव, मोबाईल क्रमांक, ओळखपत्र, वापराचे कारण व छायाचित्र नोंदवहीत ठेवण्याचे निर्देश.
- कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी सूक्ष्म नियोजन करून नियमित पुरवठा सुरू ठेवावा.

साठ्याची स्थिती
- HPCL कडे पेट्रोल व डिझेलचा ७ दिवसांचा साठा.
- BPCL कडेही पेट्रोल व डिझेलचा सुमारे ७ दिवसांचा साठा.
- IOCL कडे मोठ्या प्रमाणात पेट्रोल व डिझेलचा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत.
- जिल्ह्यात एकूण 420 पेट्रोलपंप असून सात दिवसांचा साठा उपलब्ध.
- पाकणी डेपो येथे मुंबईतील रिफायनरीमधून पाइपलाइनद्वारे सतत पुरवठा सुरू.

दररोजची गरज
सोलापूर जिल्ह्यास दररोज सुमारे 624 KL पेट्रोल व 1240 KL डिझेलची आवश्यकता भासते. त्यानुसार पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरून इंधन साठवणूक करू नये.

इंधन बचतीचे आवाहन
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासनाने दररोज किमान 1 टक्का इंधन बचत करण्याचे आवाहन केले आहे. एक टक्का इंधन बचत झाल्यास दररोज 24 कोटींची बचत होऊ शकते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |