सहकार समृद्धी सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात साखर कारखाना

👤 संकेत तुकाराम सानप | 📅 14 May 2026 | 👁 241 Views
सहकार समृद्धी सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात साखर कारखाना
सहकार समृद्धी हीच आर्थिक विकासाची महत्त्वाची दरी मा मंत्री बाळासाहेब थोरात साहेब
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ गळीत हंगामाच्या प्रारंभासाठी आज पहिल्या मिल रोलर शुभारंभाचे पूजन करण्यात आले. तसेच डिस्टलरी प्रकल्पाने तब्बल १ कोटी ४० लाख लिटर इथेनॉल उत्पादनाचा उच्चांकी आणि यशस्वी टप्पा पार केल्याबद्दल सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांमध्ये अल्कोहोलपासून मद्यनिर्मिती केली जाते. मात्र सहकारमहर्षी तिर्थरूप भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श विचारसरणी, शिस्त आणि मूल्यांचा वारसा जपत थोरात सहकारी साखर कारखान्यात मद्यनिर्मिती न करता इंडस्ट्रियल अल्कोहोलचे उत्पादन केले जाते, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. सामाजिक बांधिलकी जपत कारखान्याने सातत्याने प्रगतीची वाट धरली असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायम उच्चांकी भाव देण्याची परंपराही जपली आहे.

वीज निर्मिती आणि इथेनॉल प्रकल्पामुळे कारखान्याला मोठे बळ मिळत आहे. जागतिक पातळीवरील बदलत्या परिस्थितीमुळे आणि युरोपियन देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून इथेनॉलचे महत्त्व आज संपूर्ण जगाला पटले आहे. आपल्या देशातही पेट्रोल-डिझेलवरील वाढते अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल हा प्रभावी आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरत आहे.

इथेनॉल निर्मिती करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना केंद्र सरकारने रास्त आणि प्रोत्साहनपर दर निश्चित करून दिले पाहिजेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सांघिक प्रयत्न, शिस्तबद्ध नियोजन आणि सहकाराच्या बळावर कारखान्याची ही यशस्वी वाटचाल भविष्यातही अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास यावेळी मा.मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांनी व्यक्त केला
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |