तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केंद्र शासनाने सुरू केली SMILE शिष्यवृत्ती योजना

👤 अतुल फसाले | 📅 29 June 2026 | 👁 122 Views
तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केंद्र शासनाने सुरू केली SMILE शिष्यवृत्ती योजना
सोलापूूर दि. 25 :- केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या Support for Marginalized Individuals for Livelihood and Enterprise (SMILE) योजनेअंतर्गत तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता ९ वीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शिक्षण घेणाऱ्या तृतीयपंथी विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
पात्रता : शासनमान्य शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच UGC/AICTE मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी यासाठी पात्र राहतील.

निकष:- Transgender Certificate असणे आवश्यक आहे.

लाभाचे स्वरूपः- पूर्व-माध्यमिक (Pre-Matric) व उत्तर-माध्यमिक (Post-Matric) स्तरासाठी

वार्षिक रु. १३ हजार ५०० इतकी शिष्यवृत्ती

तसेच अर्जदार भारतीय नागरिक असावा व इतर कोणत्याही केंद्र अथवा राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेत नसावा व विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था व संबंधित यंत्रणांनी या योजनेची व्यापक प्रसिद्धी करून पात्र तृतीयपंथी विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करावे, असे निर्देश समाज कल्याण आयुक्तालयाने दिले आहेत. अधिक माहितीसाठी तृतीयपंथी व्यक्तींनी केंद्र शासनाच्या https://transgender.dosje.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज करावा असे आवाहन श्रीमती सुलोचना सोनवणे, सहायक आयुक्त, समाज कल्याण सोलापूर यानी केले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |