PACL (पर्ल्स )कंपनीच्या मालमत्तांच काय होतय ?

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 30 June 2026 | 👁 424 Views
PACL (पर्ल्स )कंपनीच्या मालमत्तांच काय होतय ?
समितीने स्पष्ट केले आहे की, मालमत्तांची विक्री जेथे आहे, जसे आहे आणि जे काही आहे' या तत्त्वावर होईल. मालमत्तेवर कोणताही दावा, देणी किंवा कर्जभार आढळल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी खरेदीदाराची राहील. त्यामुळे बोलीदारांनी टायटल डीडसह सर्व कागदपत्रांची स्वतः खातरजमा करावी, असे आवाहन समितीने केले आहे.
संपूर्ण देशभरातील गुंतवणूकदारांच्या आशा लागून राहिलेल्या आहेत की आपले पैसे परत कधी मिळणार? गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी सेबीने नेमलेल्या न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) आर.एम. लोढा समितीने PACL लि. कंपनीच्या चार राज्यांतील मालमत्तांच्या ई-लिलावाची जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या मालमत्ता विकून गुंतवणूकदारांना परतावा देण्यात येणार आहे सुब्रत भट्टाचार्य विरुद्ध भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड (सेबी) या प्रकरणात 2 फेब्रुवारी 2016 आणि 8 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार न्या. लोढा समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीने हिमाचल प्रदेश-सोलन, गुजरात-वडोदरा, ओडिशा-कटक आणि महाराष्ट्र-पुणे येथील PACL च्या मालमत्ता ई लिलाव द्वारे विकण्याचा निर्णय घेतला आहे.लिलावाचे वेळापत्रक पुढील प्रमाणे समितीने 'प्रस्तावाकरिता विनंती' (RFP) 30 जून 2026 रोजी प्रसिद्ध केली आहे. इच्छुकांनी 30 जूनपासून बोली सादर करता येणार असून, बोलीची अंतिम मुदत 10 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. ई-लिलाव 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होईल.माहिती मिळवण्यासाठी RFP आणि मालमत्तेचे दस्तऐवज http://sebi.gov.in, http://sebipaclproperties.com, http://bankeauctionwizard.com व http://bankeauctions.com या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |