NFSM अंतर्गत मोंड येथे नाचणी बियाणे वाटप; घरघंटींचेही वितरण

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 20 June 2026 | 👁 210 Views
NFSM अंतर्गत मोंड येथे नाचणी बियाणे वाटप; घरघंटींचेही वितरण
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM) अंतर्गत ग्रामपंचायत मोंड येथे नाचणी पिकाच्या बियाण्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे होते.
यावेळी शामल अनभवणे, अभय बापट, गणेश तिर्लोटकर, आरती पाटील, संभाजी जाधव, दीपक सांगोळे तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सहाय्यक कृषी अधिकारी दीपक सांगोळे यांनी उपस्थित मान्यवर व शेतकऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी आरती पाटील यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच नाचणी बियाणे वितरण कार्यक्रमाची माहिती दिली. ग्रामपंचायत मोंडच्या प्रशासकीय समिती सदस्यांनीही आपल्या मनोगतातून शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी गणेश राणे यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच २३ जून रोजी होणाऱ्या नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंचायत समितीच्या सेस फंडातून घरघंटीसाठी निवड झालेल्या दोन लाभार्थ्यांना घरघंटींचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात कृषी विभागाच्या वतीने ‘गोकृपा अमृत’ तयार करण्याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ए.आय. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा ऊस पिकाचे उत्पादन वाढून भरीव आर्थिक फायदा- हर्षवर्धन पाटील | उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन |