सारसून येथे आठवडी बाजार समितीचा भव्य आठवडी बाजार
प्रतिनिधी – जितेंद्र मोरघा
सारसून ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने मगरध्वज आठवडी बाजार समितीच्या माध्यमातून सारसून येथे मोठ्या स्वरूपात आठवडी बाजार सुरू करण्यात आला. ६ ऑक्टोबरपासून दर मंगळवारी हा आठवडी बाजार भरणार असल्याची माहिती बॅनरद्वारे देण्यात आली आहे.या आठवडी बाजारात नागरिकांना विविध प्रकारच्या वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. बाजाराचे प्रमुख आकर्षण म्हणून ताजी मच्छी व मावरा थेट खवलेवाडा येथील व्यापाऱ्यांकडून, तसेच शेतातून थेट आणलेला ताजा भाजीपाला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना ताजा भाजीपाला व मच्छी खरेदी करण्यासाठी नागरिकांना सोयीस्कर होणार आहे.
याशिवाय बाजारात किराणा, कपडे, कटलरी तसेच दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे सारसून व परिसरातील नागरिकांसाठी हा आठवडी बाजार खरेदीच्या दृष्टीने सोयीचा ठरणार आहे.
स्थानिक नागरिकांना ताज्या व आवश्यक वस्तू सहज उपलब्ध व्हाव्यात, तसेच स्थानिक व्यापारी व शेतकऱ्यांना व्यवसायाची संधी मिळावी, या उद्देशाने हा आठवडी बाजार अधिक मोठ्या स्वरूपात सुरू करण्यात येत असल्याचे बॅनरवरून स्पष्ट होते.