सांगली एलसीबीची विशेष मोहीम; पारधी समाजातील १४ पाहिजे, फरारी आरोपी पोलिसांसमोर हजर.

👤 संतोष एडके तासगाव | 📅 06 October 2026 | 👁 36 Views
सांगली एलसीबीची विशेष मोहीम; पारधी समाजातील १४ पाहिजे, फरारी आरोपी पोलिसांसमोर हजर.

दैनिक आखुर / संतोष एडके

सांगली : पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांच्या सूचनेनुसार विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) पारधी समाजातील १४ पाहिजे व फरारी आरोपींना पोलिसांसमोर हजर करण्यात यश मिळविले आहे. संबंधित आरोपींविरुद्ध सांगली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या २० प्रलंबित गुन्ह्यांचा पुढील तपास करण्यात येणार आहे.
मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या संकल्पनेतून ‘पाहिजे, फरारी आरोपींची आत्मसमर्पण योजना’ या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार तसेच अंमलदार उदयसिंह माळी, संदिप गुरव, अरुण पाटील, सागर लवटे, मच्छिद्र बडे, अमर नरळे, सुनिता शेजाळे, सुरज थोरात, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते व रोहन घस्ते यांचे पथक तयार केले होते.
सदर पथकाने सांगली जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर जाऊन पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेतला. पथकाने संबंधित आरोपींच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांच्याबाबत माहिती मिळविली. त्यानंतर आरोपींना विश्वासात घेऊन त्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यांना कायदेशीर प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न करण्यात आले.
या विशेष मोहिमेत २ फरारी व १२ पाहिजे, असे एकूण १४ आरोपी पोलिसांसमोर हजर झाले. यामध्ये सांगली शहर पोलीस ठाण्याकडील ७ गुन्हे, आष्टा पोलीस ठाण्याकडील ३ गुन्हे, इस्लामपूर पोलीस ठाण्याकडील ६ गुन्हे आणि कुंडल पोलीस ठाण्याकडील ४ गुन्हे, अशा एकूण २० प्रलंबित गुन्ह्यांचा समावेश आहे.
पोलिसांसमोर हजर करण्यात आलेल्या संबंधित आरोपींना त्यांच्या प्रलंबित गुन्ह्यांच्या पुढील तपासासाठी संबंधित पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आले आहे.
सदर उपक्रमामध्ये मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, मा. अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, मा. निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार तसेच दलित महासंघाचे पदाधिकारी सुधाकर वायदंडे, शशिकांत नांगरे, सदाभाऊ चांदणे, सागर लोटे, शिवाजी पांढरे, प्रभाकर तांचीरे, नारायण वायदंडे, दत्तात्रय परिखे, गोरख सावंत तसेच आदिवासी पारधी हक्क अभियानाचे टारहान पवार, निर्मला पवार, इंद्रजीत काळे, सुनील काळे, शेट पचार यांच्या सहकार्याने पोलीस मुख्यालय, सांगली येथे सदर कार्यक्रम पार पडला.
पोलिसांच्या अधिकृत माहितीनुसार करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमामुळे प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळण्यास मदत होणार असून, पाहिजे व फरारी आरोपींना कायदेशीर प्रक्रियेत आणण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
तासगाव तालुक्यात ‘सेवा सेतू’चे भव्य शिबिर; निमणी येथे गुरुवारी आयोजन : तहसीलदार अतुल पाटोळे. | तासगाव तालुक्यात ‘सेवा सेतू’चे भव्य शिबिर; निमणी येथे गुरुवारी आयोजन : तहसीलदार अतुल पाटोळे. | सांगली एलसीबीची विशेष मोहीम; पारधी समाजातील १४ पाहिजे, फरारी आरोपी पोलिसांसमोर हजर. | वडजी येथील तलाठी सौ. वैशाली वाघ यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास भडगाव तहसीलवर शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा | *महाराष्ट्र चे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शेतकऱ्यांच्या बांधावर* | ट्रॅक्टर अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू एडगाव-आंबेडी येथील दुर्घटना ; तालुक्यात हळहळ... | मराठा समाजाचे नेते एस. टी. सावंत यांचे निधन | भडगाव तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे पंचनामे सुरू | खुल्या जिल्हा कारागृहाला मंजुरी; बिलाखेड शिवारात होणार उभारणी | *खासगी पंटरमार्फत २० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी भुसावळचे पोलिस हवालदार निलंबित* |