*दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या व गिरणा नदी पात्रावरील अवैध्य वाळूचा उपसा थांबवा या मागणीसाठी भाजपा किसान मोर्चा* *चे जिल्हाधिकारी यांना निवेदन*

👤 शुभम सुभाष सुराणा | 📅 02 October 2026 | 👁 32 Views
*दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या व गिरणा नदी पात्रावरील अवैध्य वाळूचा उपसा थांबवा या मागणीसाठी भाजपा किसान मोर्चा* *चे जिल्हाधिकारी यांना निवेदन*
तालुका प्रतिनिधी: भडगाव तालुक्यातील व जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, त्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी विविध मागण्यांचे निवेदन भाजप किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना देण्यात आले. भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास मोरे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ पाटील, जिजाबराव पाटील, रत्नाकर पाटील, बापुराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात भडगाव गिरणा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे भूजल पातळी खालावण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे भविष्यात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून वाळूमाफियांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, भडगाव व जळगाव तालुक्यांत वाढलेल्या शेतकऱ्यांची तार व केबल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी चोरट्यांचा बंदोबस्त करावा. भडगावसह जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढल्याने पशुधनाचे नुकसान होत असून, संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तातडीने द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
तसेच प्रलंबित पीक विम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, शासकीय ज्वारी खरेदी केंद्रांना मुदतवाढ देऊन शिल्लक ज्वारीची खरेदी पूर्ण करावी, तसेच रब्बी हंगामासाठी वाघूर व गिरणा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
याशिवाय, २०२३ पासून वारसाहक्काने किंवा खरेदीद्वारे जमीन मिळविलेल्या अनेक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व मुख्यमंत्री किसान योजनेचा लाभ मिळत नसून, फार्मर आयडी काढण्यातही अडचणी येत आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यासोबतच ई-पीक पाहणीमध्ये तलाठ्यांकडून पीक पेरा मंजूर होऊनही पोर्टलवर मंजुरी दिसत नसल्याच्या तक्रारी आहेत. तसेच पीक पेरा नोंदविताना लॉगिन प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात. कृषी विभागात केवळ ५८ टक्के कर्मचारी कार्यरत असून, ४२ टक्के पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांची कामे रखडत आहेत. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. 'मागेल त्याला सौर पंप' योजनेतील सौर पॅनेल नैसर्गिक आपत्तीमुळे खराब झाल्यास पाच वर्षांची कंपनी गॅरंटी असतानाही दुरुस्ती किंवा बदलून देण्यास कंपन्यांकडून टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारींची दखल घ्यावी. तसेच राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) अंतर्गत पशुपालन व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज मंजूर करताना लावण्यात येणाऱ्या जाचक अटी शिथिल कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष कमलाकर रोटे, मनोहर पाटील, सच्चिदानंद चव्हाण, किशोर नारखेडे, घनश्याम पाटील, किसन पाटील, जिल्हा चिटणीस अरुण पाटील, कुंदनसिंग पाटील, संजय पाटील, भगवान पाटील, पारोळा तालुकाध्यक्ष भरत पाटील, कैलास पाटील, प्रमोद पाटील यांच्यासह किसान मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
*दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या व गिरणा नदी पात्रावरील अवैध्य वाळूचा उपसा थांबवा या मागणीसाठी भाजपा किसान मोर्चा* *चे जिल्हाधिकारी यांना निवेदन* | चोरीस गेलेले १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; तासगाव पोलिसांची कारवाई १२७.१८ ग्रॅम सोन्याचे दागिने न्यायालयाच्या आदेशाने हक्कदाराच्या स्वाधीन | भूजल पातळी खालावली, शेतकऱ्यांची चिंता वाढली; रोहित पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्याची मागणी | ट्रक अडवून नऊ लाखांचा दरोडा; उमदी पोलिसांकडून चौघांना अटक : १७ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त | काळाचा घाला! पिकअपला दुचाकीची धडक; वडिलांसह सहा वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत आई गंभीर जखमी; | कॅप्सूलमधून एमडीची तस्करी; ९६५ ग्रॅम ड्रग्जसह एक जेरबंद सांगली एलसीबीची विट्यात कारवाई; ४२.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त. | उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी |