राज्यभरातील पत्रकार आज सांगलीत; शिवराज काटकर स्वीकारणार राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा. पत्रकारितेच्या नव्या पर्वाचा ऐतिहासिक सोहळा सांगलीत; राज्यभरातील पत्रकारांची उपस्थिती राहणार

👤 संतोष एडके तासगाव | 📅 30 August 2026 | 👁 49 Views
राज्यभरातील पत्रकार आज सांगलीत; शिवराज काटकर स्वीकारणार राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा. पत्रकारितेच्या नव्या पर्वाचा ऐतिहासिक सोहळा सांगलीत; राज्यभरातील पत्रकारांची उपस्थिती राहणार

: मराठी पत्रकार परिषदेचे नूतन राष्ट्रीय अध्यक्ष शिवराज काटकर यांच्या पदग्रहण सोहळ्याचा ऐतिहासिक कार्यक्रम आज, रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी सांगलीतील विश्रामबाग येथील पोलीस मुख्यालयातील कृष्णा मॅरेज हॉल येथे होणार आहे. या सोहळ्यानिमित्त पश्चिम महाराष्ट्र पत्रकार मेळावा-२०२६ आयोजित करण्यात आला असून, राज्यभरातील पत्रकारांची मोठी उपस्थिती राहणार आहे.
मराठी पत्रकार परिषद, सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता शिवराज काटकर यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा होणार असून, या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सांगली सज्ज झाली आहे.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादनाने होणार आहे. त्यानंतर विश्रामबाग ते कृष्णा मॅरेज हॉल अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सकाळच्या सत्रात पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळा, राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा तसेच अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारच्या सत्रात मुंबई प्रेस क्लबच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा तसेच सांगली जिल्ह्यातील संपादकांचा सत्कार करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांचा मेळावा यावेळी होणार असून, पत्रकारितेतील बदलती आव्हाने, पत्रकार सुरक्षा, ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न, डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव, फेक न्यूज आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे पत्रकारितेत होत असलेले बदल यावर विचारमंथन होणार आहे.
पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी पत्रकारांना मार्गदर्शन करण्यात येणार असून, सहभागी पत्रकारांना प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहे. बदलत्या काळातील पत्रकारितेची दिशा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पत्रकारांच्या संघटनात्मक प्रश्नांवरही या मेळाव्यात चर्चा होणार आहे.
शिवराज काटकर यांनी गेल्या चार दशकांहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात कार्य केले असून, निर्भीड, तत्त्वनिष्ठ आणि समाजाभिमुख पत्रकारितेचा ठसा उमटविला आहे. सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणे ही त्यांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये मानली जातात.
शिवराज काटकर यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने राज्यभरातील पत्रकार एकाच छताखाली एकत्र येणार असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वातून पत्रकारांच्या विविध प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळेल.
आजच्या या कार्यक्रमासाठी सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या संयुक्त विद्यमाने भव्य असे नियोजन केले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |