सांगलीत शुक्रवारी ‘महावॉकेथॉन २०२६’ ‘वॉक फॉर वॉटर’मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 18 August 2026 | 👁 9 Views
सांगलीत शुक्रवारी ‘महावॉकेथॉन २०२६’ ‘वॉक फॉर वॉटर’मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष
जलसंधारणाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता सांगलीत ‘महावॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात आली आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने आयोजित या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंद कॉलेजच्या मागील गेट (१०० फूटी रोड) ते बापट मळा आणि पुन्हा वालचंद कॉलेज असा महावॉकेथॉनचा मार्ग राहणार आहे.
१५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत राज्यभर ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येणार असून, जलयुक्त शिवार २.०, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, अमृत सरोवर आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना यांसारख्या उपक्रमांची जनजागृती करण्यात येणार आहे.
‘माती वाचवा-पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा’ हा मोहिमेचा मुख्य संदेश असून, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणासाठी लोकसहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
महावॉकेथॉनसाठी ऑनलाइन QR कोडद्वारे नोंदणीची सुविधा उपलब्ध असून सहभागी नागरिकांना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा दिवस ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त राज्यभर १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह राबविला जात आहे.
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून, २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी महावॉकेथॉन आयोजित करण्यात आली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
सांगलीत शुक्रवारी ‘महावॉकेथॉन २०२६’ ‘वॉक फॉर वॉटर’मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष | सांगोला तालुक्यातील नाझरे परिसरामधील अवैध धंद्यांमध्ये वाढ , तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी ग्रामस्थांचा कारवाईचा आग्रह | कणकवलीतील जुगार कारवाईवर पालकमंत्री नितेश राणेंचा थेट इशारा; ‘ संशयित आरोपींना मदत करणारे एकही अधिकारी-कर्मचारी सुटणार नाही’ | सांगली एलसीबीची धडाकेबाज कारवाई; खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या दोन तासांत जेरबंद | असलदे पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार नांदगावच्या पोलीस पाटलांकडे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे आदेश; | नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर तळेरे बाजारपेठेत नागमूर्त्या दाखल; चाकरमान्यांचीही गावाकडे लगबग | तासगाव पोलिसांची दमदार कामगिरी; अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा तीन दिवसांत छडा, गुजरातमधून आरोपी जेरबंद | स्व. प्राचार्य सुब्राव बंडगर सर स्मृती ग्रंथ 'माणहिरा' चे आज अनकटाळमध्ये प्रकाशन व अभ्यासाचे उद्घाटन | वैभववाडी बसस्थानकाच्या समस्यांवर   जि प सदस्य प्रमोद रावराणे आक्रमक विभागीय नियंत्रकांना निवेदन; १८ ऑगस्टला प्रत्यक्ष पाहणीचे आश्वासन | गुरे आडवी आल्याने डंपर पलटी; सहा प्रवासी बचावले कोल्हापूर-तळेरे मार्गावर एडगाव-रामेश्वरवाडी येथे अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली |