कणकवलीतील जुगार कारवाईवर पालकमंत्री नितेश राणेंचा थेट इशारा; ‘ संशयित आरोपींना मदत करणारे एकही अधिकारी-कर्मचारी सुटणार नाही’

👤 तुषार शिंगाडे | 📅 15 August 2026 | 👁 6 Views
कणकवलीतील जुगार कारवाईवर पालकमंत्री नितेश राणेंचा थेट इशारा; ‘ संशयित आरोपींना मदत करणारे एकही अधिकारी-कर्मचारी सुटणार नाही’


कणकवली : शहरातील एका लॉजच्या मागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अंदर-बाहर जुगार अड्ड्यावर ११ ऑगस्ट रोजी कणकवली पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले होते. या कारवाईत १४ हजार ४०० रुपयांची रोकड आणि पत्ते जप्त करण्यात आल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईशी संबंधित व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कारवाईबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या प्रकरणाची थेट दखल जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली आहे. ओरोस येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी संबंधित व्हिडिओ क्लिप आपण पाहिली असून, त्यातून काही धक्कादायक बाबी समोर आल्याचे सांगितले. घटनास्थळी सहा जण असताना केवळ पाच जणांवर कारवाई दाखविण्यात आली, तसेच कारवाईचे घटनास्थळही चुकीचे दाखविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई होणारच; मात्र त्यांना मदत करणारे अधिकारी-कर्मचारीही कारवाईपासून सुटणार नाहीत, असा थेट इशारा राणे यांनी दिला. या प्रकरणातील कोणीही सुटणार नाही, मग तो कुठेही पळून जाऊ दे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेची माहिती त्याच दिवशी जिल्हा पोलिस अधीक्षक आणि अपर पोलिस अधीक्षक यांना दिल्याचेही राणे यांनी सांगितले.

‘जे अधिकारी-कर्मचारी त्यांना मदत करत होते, त्यातील एकही सुटणार नाही. आम्ही दोघेही स्पष्ट भूमिकेचे आहोत. या प्रकरणात कोणतीही तडजोड किंवा वशिलेबाजी चालणार नाही. जे कोणी मस्ती करत आहेत, त्यांच्यावर कारवाई होणारच,’ असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

पालकमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे कणकवली पोलिस ठाण्यातील संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता असून, प्रत्यक्ष सहावा आरोपी कोण होता, घटनास्थळ चुकीचे का दाखविण्यात आले आणि कारवाईदरम्यान नेमके काय घडले, याबाबत आता तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जुगार कारवाईतील विसंगती आणि त्यानंतर समोर आलेल्या व्हिडिओ क्लिपमुळे हे प्रकरण आता अधिक चर्चेत आले असून, संबंधितांवर नेमकी कोणती कारवाई होते, याकडे कणकवलीकरांचे लक्ष लागले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
कणकवलीतील जुगार कारवाईवर पालकमंत्री नितेश राणेंचा थेट इशारा; ‘ संशयित आरोपींना मदत करणारे एकही अधिकारी-कर्मचारी सुटणार नाही’ | सांगली एलसीबीची धडाकेबाज कारवाई; खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या दोन तासांत जेरबंद | असलदे पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार नांदगावच्या पोलीस पाटलांकडे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे आदेश; | नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर तळेरे बाजारपेठेत नागमूर्त्या दाखल; चाकरमान्यांचीही गावाकडे लगबग | तासगाव पोलिसांची दमदार कामगिरी; अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा तीन दिवसांत छडा, गुजरातमधून आरोपी जेरबंद | स्व. प्राचार्य सुब्राव बंडगर सर स्मृती ग्रंथ 'माणहिरा' चे आज अनकटाळमध्ये प्रकाशन व अभ्यासाचे उद्घाटन | वैभववाडी बसस्थानकाच्या समस्यांवर   जि प सदस्य प्रमोद रावराणे आक्रमक विभागीय नियंत्रकांना निवेदन; १८ ऑगस्टला प्रत्यक्ष पाहणीचे आश्वासन | गुरे आडवी आल्याने डंपर पलटी; सहा प्रवासी बचावले कोल्हापूर-तळेरे मार्गावर एडगाव-रामेश्वरवाडी येथे अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली | गोंधळी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी इंगळे यांचे निधन | एमपीएससीच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली; अंतिम उत्तरतालिकेला दोन महिने उलटूनही जीएमएलची प्रतीक्षा |